%20-%202024-08-28T103952.366.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Festival Special Weekend: तुच सुख कर्ता तुच दु:खहर्ता...! हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापुर्वी गणेशाची पूजा केली जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीतपणे पूर्ण होते असे मानले जाते.
यंदा गणेशोत्सवाला ७ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात. देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव पाहायला मिळतो. यंदा गणेशोत्सवाला वीकेंड आल्याने कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर देशातील प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट देऊ शकता.