Good Bye 2023 : 2023 मध्ये या ठिकाणांना सर्वात जास्त लोकांनी केलं सर्च, पण का?

भारतीय लोक परदेशी पर्यटन स्थळांकडे होतात अधिक आकर्षित
Good Bye 2023
Good Bye 2023 esakal

Good Bye 2023 :

लवकरच 2023 हे वर्ष संपणार आहे. मागे वळून पाहण्याची, सरत्या वर्षाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. सरत्या वर्षाच्या आठवणी गाठीशी घेऊन नव्या वर्षाचे स्वागत लोक उत्साहात करतात. पण, या वर्षीच्या काही गोष्टी, काही आठवणी मनावर कोरलेल्या असतात. त्यांना सहज विसरता येत नाही.

2023 मध्ये झालेला अपघात, या वर्षात केलेल्या ट्रिपची आठवण नेहमीच काढली जाईल. दरवर्षी नवनव्या ठिकाणांना भेट देणाऱ्या लोकांनी यंदाही अनेक ठिकाणांना गुगलवर सर्च केलं. या वर्षातही, ट्रॅव्हलप्रेमींनी Google वर त्यांच्या आवडत्या ठिकाणांबद्दल सर्च केलं. एका रिपोर्टनुसार, गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी बहुतेक ठिकाणे परदेशातील आहेत.

Good Bye 2023
Thailand Tour : निवांत वेळ घालवण्यासाठी थायलंडला जायला लागतंय; जाणून घ्या खर्च, अन् काय काय पहाल

भारतातील काही प्रेक्षणीय स्थळांनी जगभरातील लोकांचे मन मोहून टाकले आणि त्याबद्दल सर्वाधिक सर्च केले गेले. भारतीयांनी सर्वाधिक शोधलेल्या ठिकाणांच्या यादीत, भारतातील फक्त गोव्याचा टॉप 5 मध्ये समावेश आहे.

गोवा हे भारतात सर्वाधिक शोधले जाणारे भारतीय ठिकाण बनले आहे. गोव्याबद्दल भारतीयांमध्ये किती क्रेझ आहे, हे यावरून दिसून येते. ऋतू कोणताही असो, गोव्याला भेट देण्याची संधी कोणीच सोडत नाही.

Good Bye 2023
Schoolympics 2023 : सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत सिंहगड सिटी स्कूलच्या संघाने विजेतेपदावर कोरले नाव

ही आहे यादी

व्हिएतनाम

गोवा

बाली

श्रीलंका

थायलॅंड

कश्मीर

कुर्ग

अंडमान आणि निकोबार द्वीप समुह

इटली

स्विर्त्झलँड

Good Bye 2023
Schoolympics 2023 : कुंजल , रीतिशा, श्रावणीला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपदाचा मान

गुगलवर भारतातील 10 सर्वाधिक शोधल्या गेलेल्या ठिकाणांपैकी फक्त 4 ठिकाणे भारतातील आहेत. या 4 ठिकाणी गोवा पहिल्या क्रमांकावर आहे. काश्मीरने दुसऱ्या क्रमांकावर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे.

कुर्ग (कर्नाटक) आणि अंदमान आणि निकोबार बेटे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या यादीत भारतीय पर्यटकांसाठी अलीकडेच व्हिसा मोफत देण्यात आलेल्या ठिकाणांच्या नावांचाही समावेश आहे.

Good Bye 2023
good bye : 'ब्रह्मास्त्र'नंतर अमिताभ बच्चन करणार 'गुडबाय'..

प्रवासाची आवड असलेले भारतीय भारतीय पर्यटन स्थळांपेक्षा परदेशी पर्यटन स्थळांकडे अधिक आकर्षित होत असल्याचे या यादीतून दिसून आले आहे. भारतीय पर्यटन स्थळांमध्ये गोवा ही पर्यटकांची पहिली पसंती आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे काश्मीर पर्यटकांना आकर्षित करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com