International Tourist Destination Ganpatipule Ratnagiri
International Tourist Destination Ganpatipule Ratnagiriesakal

Tourism News : गणपतीपुळेत पर्यटकांची प्रचंड गर्दी; दररोज तब्बल 20 हजार भाविक-पर्यटकांची नोंद, हॉटेल-लॉजिंग हाऊसफुल

गणपतीपुळे मंदिरात १८ हजार पर्यटकांची नोंद झाली.
Summary

दिवाळीची सुट्टी १९ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे पर्यटकांचा राबताही अजून दोन दिवस राहील, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी : दिवाळीनंतर मुंबई-पुण्यासह विविध जिल्ह्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्र किनार्‍यांकडे वळलेली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ (International Tourist Destination) म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीपुळेमध्ये (Ganapatipule) पर्यटकांची (Tourists) प्रचंड गर्दी झालेली आहे.

येथील प्रसिद्ध श्रींच्या मंदिरात १४ नोव्हेंबरपासून दररोज २० हजार भक्त दर्शन घेऊन जात असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे किनार्‍यांवरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह हॉटेल-लॉजिंगवाल्यांची दिवाळी चांगली झाली आहे. पर्यटकांचा राबता रविवारपर्यंत (ता. १९) राहणार आहे.

International Tourist Destination Ganpatipule Ratnagiri
Maratha Reservation : मनोज जरांगेंना आव्हान कशासाठी? आपण एकमेकांचे वैरी नाही; प्रकाश आंबेडकरांचे भुजबळांवर टीकास्त्र

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान झाल्यानंतर अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडणे पसंत केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील किनार्‍यांसह गुहागर, रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावसमध्येही पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे.

International Tourist Destination Ganpatipule Ratnagiri
Ind vs Aus Final : जगात भारी, आम्ही कोल्हापुरी! फायनल सामन्यात मोदी स्टेडियमवर घुमणार कोल्हापूरचा Laser Show

गणपतीपुळेत प्रचंड गर्दी झाली असून, परजिल्ह्यातून आलेल्या खासगी वाहनांमुळे येथील रस्त्यांवर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. मंगळवारी गणपतीपुळे मंदिरात १८ हजार पर्यटकांची नोंद झाली. त्यानंतर दरदिवशी २० हजार पर्यटक येऊन गेले. आजही (ता. १७) तेवढीच नोंद झाल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते.

येणारा पर्यटक श्रींचे दर्शन घेतल्यानंतर किनार्‍यावर फिरण्यासाठी जातो. समुद्रस्नानासह फेरीबोटीमधून सफर, किनार्‍यावर घोडे-उंटसवारी, घोडागाडीमधून सायंकाळी फिरणे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नारळपाणी पिण्यासाठी स्टॉलवर पर्यटक धाव घेत आहेत. फोटोग्राफरनाही याचा लाभ होत असून गेल्या चार दिवसात चांगली कमाई होत आहे.

International Tourist Destination Ganpatipule Ratnagiri
Maratha Reservation : माझ्या जातीच्या आड कोणी आलं, तर मी त्याला सोडणार नाही; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

लॉजिंगलाही चांगला प्रतिसाद असून, सध्या सुमारे ८० टक्क्याहून अधिक प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला एक कोटीच्या दरम्यान उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. दिवाळीची सुट्टी १९ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे पर्यटकांचा राबताही अजून दोन दिवस राहील, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

गणपतीपुळेतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. वाहनांची संख्या अधिक आणि रस्ते अरूंद असल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. पर्यटकांना येथे धुळीचाही सामना करावा लागतो. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे.

- कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com