Malvan : हंगामाची सांगता होऊनही मालवणात पर्यटकांची मोठी गर्दी; रॉकगार्डनला सर्वाधिक पसंती

किल्ले दर्शन, जलक्रीडा बंद असल्याने येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांनी रॉकगार्डनला मोठी पसंती दिली.
Large crowd of tourists at Malvan
Large crowd of tourists at Malvanesakal
Summary

बंदर विभागाने किल्ले दर्शन, जलक्रीडा २६ मेपासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन व्यावसायिकांना केल्या.

मालवण : पर्यटन हंगामाची सांगता झाली असली तरी येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. किल्ले दर्शन, जलक्रीडा बंद असल्याने पर्यटकांचा (Malvan Tourist) लोंढा रॉकगार्डनकडे वळला असल्याचे दिसून येत असून पर्यटक रॉकगार्डनला पसंती देत आहेत.

बंदर विभागाने किल्ले दर्शन, जलक्रीडा २६ मेपासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन व्यावसायिकांना केल्या. त्यानुसार सर्व पर्यटन व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. सद्य:स्थितीत समुद्रातील वातावरण चांगले असल्याने किल्ले दर्शन आणि जलक्रीडेसाठी वाढीव मुदत मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांनी मेरिटाईम बोर्डाकडे केली; मात्र अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही.

Large crowd of tourists at Malvan
Kolhapur : ठरलं! लोकसभेसाठी कोल्हापुरातून 'हा' तगडा उमेदवार उतरणार रिंगणात; NCP च्या बैठकीत एकमत

पर्यटन हंगामाची सांगता झाल्याने राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या असंख्य पर्यटकांनी निवासव्यवस्थेचे आगाऊ केलेले आरक्षण रद्द केले. याचा मोठा आर्थिक फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. किल्ले दर्शन, जलक्रीडा बंद असल्याने येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांनी रॉकगार्डनला मोठी पसंती दिली.

Large crowd of tourists at Malvan
Kolhapur : पराभवाच्या भीतीनं 'त्यांच्या' पायाखालची वाळू सरकलीये; शिवसेना नेत्याचं सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

दृष्टिक्षेपात

  • गार्डनमधील सेल्फी पॉईंट पर्यटकांसाठी खास आकर्षण

  • अथांग समुद्राचे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यास झुंबड

  • लाटांचे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

  • म्युझिकल फाउंटन बंद असल्याने हिरमोड

  • आनंद लुटण्यासाठी रॉकगार्डनला पसंती

  • परिसरातील छोटेमोठे व्यवसायही तेजीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com