
Holi 2023 : पुण्यातल्या 'या' फेमस रेस्टाॅरंटमधील पुरणपोळी खाल तर आईच्या हाताची चव आठवेल
Puranpoli in Pune : पुरण पोळी ही सर्वात लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी एक आहे आणि असं कोणीच नाही ज्यांना पुरण पोळी माहिती नाही. छान लोणकढं तूप, दूध किंवा खीर आणि पुरण पोळी अजून काय हवं? त्यात होळी म्हटल्यावर पुरणाची पोळी ही आलीच, तर चला मग बघूया पुण्यात कुठे मिळते टेस्टी पुरणपोळी?
१. हॉटेल श्रेयस, डेक्कन जिमखाना, पुणे.

Puranpoli in Pune
हे एक प्रसिद्ध व्हेज रेस्टॉरंट त्यांच्या अस्सल महाराष्ट्रीयन थाळीसाठी खास फेमस आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त म्हणजे पुरणपोळीसाठी. इथल्या किंमती परवडण्याजोग्या आहेत आणि तुम्हाला आवडेल अशी चवही इथे मिळेल.
२. मम्माज् किचन, कोथरुड, पुणे.

Puranpoli in Pune
उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन पाककृतींचे मिश्रण असलेलं हे हॉटेल कोथरुडात खूप फेमस आहे, त्यांची पुरणपोळी आणि इतर महाराष्ट्रियन थाळी खूप फेमस आहे आणि गंमत म्हणजे इथे सर्व पदार्थ हे फक्त १५० रुपयाच्या आत आहेत.
३. शबरी, एफ. सी. रोड, पुणे.

Puranpoli in Pune
एफसी रोडच्या गजबजाटात, शबरी हे एक छोटेसे ठिकाण कॉलेजच्या गर्दीचे आवडते आहे. जरी रेस्टॉरंट त्यांच्या महाराष्ट्रीयन थाळींसाठी ओळखले जात असले तरी, इथले फ्रूट सॅलड आणि पुरणपोळी जास्त लोकप्रिय आहे.
४. पेशवा, शिवाजीनगर, पुणे.

Puranpoli in Pune
शिवाजीनार इथले हे ठिकाण महाराष्ट्रीयन थाळीच्या जेवणाचा अनुभव देते. उत्कृष्ट वातावरण आणि आदरातिथ्यामुळे हे ठिकाण खूप प्रचलित आहे. त्यांच्या थाळीमध्ये पुरणपोळीचा समावेश असल्याने अगदीच राजेशाही थाट असल्यासारखं वाटतं.
५. वाह मराठी डाईन एन वाईन्स, हडपसर, पुणे.

Puranpoli in Pune
तुम्ही कोकण किनार्यावरील खाद्यपदार्थांचा समावेश असलेले उत्तम जेवण रेस्टॉरंट शोधता आहात का? तर मग वाह मराठी हे परफेक्ट हॉटेल आहे.
६. आशा डायनिंग हॉल, डेक्कन जिमखाना, पुणे.

Puranpoli in Pune
आशा डायनिंग हॉल त्यांच्या घरगुती महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. हे रेस्टॉरंट फक्त थाळी सर्व्ह करतात. ते अधूनमधून उकडीचे मोदक आणि पुरणपोळी असे पदार्थही करतात. त्यांच्या किंमती बदलत राहतात पण सरासरी ३०० रुपयांपासून इथे सुरुवात होते.
७. पूना गेस्ट हाऊस, बुधवार पेठ, पुणे.

Puranpoli in Pune
पूना गेस्ट हाऊस हे चांगल्या पुरणपोळीसाठी उत्तम ठिकाण आहे. जरी, रेस्टॉरंट वर्षभर स्वादिष्ट पदार्थ देत नाही, परंतु तुम्ही विशेष प्रसंगी जसे की होळी, गुढी पाडवा आणि इतर दिवसांना इथे स्पेशल पदार्थ मिळतात. ज्यांची सुरुवात २०० रुपयांपासून होते.