उन्हळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं म्हणताय? मग अशी करा 'स्मार्ट' तयारी

Prepare like Smart of you want to travel in Summer vacations
Prepare like Smart of you want to travel in Summer vacations

उन्हाळ्याची सुट्टी  म्हणजे समर व्हेकेशन म्हटलं धमाल, मस्ती, मामाच्या गावाला जाणे, मित्र आणि नातेवाईकांना भेटणे हा बहुतेक लोकांचा बेत असतो. वडीलधाऱ्यापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच जण याची वाट पाहत असतो. पण उन्हाळ्याची सुट्टी खूप दूर आहे, मग आपण आता सुट्टीच्या नियोजनाविषयी चर्चा करत का आहोत? कारण व्हेकेशनवर जाण्यापूर्वी अगोदरच नियोजन केलेले केव्हाही चांगलेच. व्हेकेशनवर जाण्यापूर्वी प्लॅनिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हेकेशनचे प्लॅनिंग करताना आपण कायम उत्साही राहतो. प्लॅनिंग करण्यात एक वेगळाच आनंद असतो. यामुळे आपण ऑफिसमधून कामाशिवाय विनाकारण आपण रजा घेणार नाही. म्हणजेच भविष्यातील अडचणींसाठी सुट्ट्या वाचतील. तसेच विनाकारण रजा न घेतल्याने पैशाची बचत होईल. जेवढी बचत तेवढा अधिक सुट्टीचा आनंद. मग चला तर जाणून घेऊया व्हेकेशनचं प्लॅनिंग कसं करू शकतो.....

प्रथम डेस्टीनेशन ठरवा 

  • सर्व प्रथम आपल्यालाआपण व्हेकेशनसाठी कुठे जायचे हे ठरवावे लागेल. 
  • परदेशात जायचे आहे किंवा देशभर फिरायचे हे आपल्या आवडीप्रमाणे ठरवू शकतो. 
  • डेस्टीनेशनची निवड हे  गोष्टींवर अवलंबून असते. 
  • तुम्हाला डोंगर, पर्वतरांगा की बीच, शहर की कंट्रीसाईड रिसॉर्ट, गर्दीचे ठिकाणे की एकांत असलेल्या जागा यातील काय आवडते त्या बाबींवर तुमचे डेस्टीनेशन ठरवा. 
  • डेस्टिनेशन ठरवताना तुमचे बजेट किती आहे याचाही विचार करा. 
  • व्हेकेशनला कसे (एकटे, कुटुंबासोबत किंवा दोघे) जाणार हेही ठरवावे लागेल. 
  • आपली ट्रिप संस्मरणीय होण्यासाठी ट्रॅव्हलिंग टाइम आणि सीझन खूप महत्वाचे ठरतात.  

ट्रेन किंवा विमान तिकीट बुकिंग 

एकदा व्हेकेशनचं डेस्टीनेशन ठरलं कि मग वेळ येते ती तिकीट बुकिंगची. ट्रेन असो किंवा फ्लाईट अगाऊ बुकिंग करणे केव्हाही चांगले. जर बुकिंग करण्यास उशीर झाला तर फ्लाईटची तिकिटे खूप महागात पडतात. तर ट्रेनची तिकीट कन्फर्म होण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

  • आपण विदेशात जात असाल तर डायरेक्ट विमानाचं तिकीट बुक करावे. 
  • डायरेक्ट तिकीट बुक केल्याने प्रवासाच्या वेळेची बचत होईल. 
  • फ्लाईटचे तिकीट विविध ऑनलाईन वेबसाईटवरून बुक करण्यापूर्वी तिकीटाची रक्कम एकदा एअरलाईन्सच्या वेबसाईटवर जाऊन तपासून घ्यावी. 

राहण्याचे ठिकाण निश्चित करा 

व्हेकेशनला गेल्यावर आपण कुठे राहतो यावर आपल्या व्हेकेशनचा खर्च काही प्रमाणात अवलंबून असतो. त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात ठेवा. 

  • हॉटेल हे सोयीस्कर आणि फिरायला जायच्या जागेपासून दूर नसावे. 
  • आजकाल बरीच ऑनलाईन वेबसाईट्स हॉटेल्सविषयी माहिती देतात. जोडप्यांसाठी हॉटेल हा चांगला पर्याय आहे. 
  • जर सोबत कुटुंब असेल तर अपार्टमेन्टमधील चांगला फ्लॅट राहण्यासाठी भाड्याने घेऊ शकता. 
  • अशा प्रकारे घर भाड्याने देणाऱ्या वेबसाईटही ट्रेंडमध्ये आहेत. 
  • इतर राज्यांतील लोकांच्या घरी राहून तेथील अन्न आणि संस्कृतीचा आनंद घेता येईल. 

पर्यटन स्थळांची लिस्ट बनवा 

आपण हॉलिडेसाठी गेल्यानंतर तेथील सर्वच पर्यटन स्थळांना भेट काही प्रमाणात अवघड असते. त्यामुळे पुढील मुद्दे लक्षात ठेवा.
 

  • ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची आहे त्याची यादी बनवा.
  • हे सर्व शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रमुख अशी पर्यटन स्थळे सर्च करावीत. 
  • सर्च करत असताना लोकांच्या अनुभव देखील लक्षात घ्यावा आणि मगच डेस्टीनेशन ठरवावे. 
  • त्या शहरातील प्रसिद्ध जागा, चांगले रेस्टॉरंट, फ्री झू पार्क, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स हे  शोधण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉग्स वाचा.
  • टुरिस्ट वेबसाईट, फेसबुक, ट्विटर किंवा मित्र जो इथे भेट देऊन गेला आहे अशांची मदत घ्या. 
  • तसेच फिरण्यासाठी बस, टॅक्सी व लोकल ट्रेन यातील कोणता पर्याय चांगला आहे याची देखील माहिती घ्या. 

असे करा पॅकिंग 

  • प्रवास करताना किंवा व्हेकेशनला जाताना आपल्याजवळ कमीतकमी सामान असणे चांगले आहे. 
  • गरजेपेक्षा जास्त सामान पॅक करू नका. कपडे, चप्पल किंवा शूज हे सिझननुसार बरोबर घ्यावेत. 
  • कपडे असे कि घ्या जे लवकर खराब होणार नाहीत. 
  • प्रत्येक व्यक्तीसाठी एक स्वतंत्र बॅग घ्यावी आणि मुलांना त्यांची स्वत:ची बॅग हाताळण्याची जबाबदारी द्या. 
  • आवश्यक औषधे घेण्यास विसरू नका.  
  • कपडे, शूज, सौंदर्यप्रसाधने, औषधे इत्यादी वस्तू वेगवेगळ्या बॅगमध्ये पॅक करा. 
  • एखादी वस्तू काढण्याच्यावेळी दुसरी वस्तू अस्थाव्यस्त होणार नाही याची काळजी घ्या. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com