निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी 'दूधसागर'ला जाताय? मग 'ही' चूक मुळीच करु नका, अन्यथा पडेल महागात!

मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने दूधसागर धबधबादेखील (Dudhsagar Waterfall) पूर्ण क्षमतेने कोसळत आहे.
Dudhsagar waterfall
Dudhsagar waterfallesakal
Summary

सौम्य लाठीमार करत धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उठा- बशा काढण्याची शिक्षाही देण्यात आली.

बेळगाव : दूधसागर येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी उतरू नये, असा इशारा रेल्वे सुरक्षा दलाकडून (Railway Security Force RPF) मडगाव मार्गावरील रेल्वेमध्ये दिला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने दूधसागर धबधबादेखील (Dudhsagar Waterfall) पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव, हुबळी, गोव्यासह अनेक पर्यटक हजारोंच्या संख्येने दूधसागर येथे येतात.

Dudhsagar waterfall
Chiplun Flood : आता महापुराची माहिती मिळणार एका 'क्लिक'वर; Mobile वर येणार सतर्क राहण्याचा संदेश

मात्र, चार वर्षांपासून दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तरी देखील प्रत्येक पावसाळ्यात दूधसागर धबधब्यावर जाण्याचा पर्यटक प्रयत्न करतात. रविवारी (ता. १६) देखील सुमारे तीन ते चार हजार पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वेने गेले होते, पण रेल्वे स्थानकावर उतरताच पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास रेल्वे सुरक्षा दलाने मनाई केली.

Dudhsagar waterfall
Sindhudurg Flood : सिंधुदुर्गात वरुणराजाची जोरदार मुसंडी, कणकवलीला महापुराचा धोका; आंबोली, करुळ घाटात कोसळल्या दरडी

सौम्य लाठीमार करत धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उठा- बशा काढण्याची शिक्षाही देण्यात आली. आता रविवारी (ता. २३) पुन्हा पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यांना रोखण्यासाठी रेल्वेमध्ये सुरक्षा दलाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे इशारा दिला जात आहे. आरपीएफचे जवान रेल्वेच्या प्रत्येक बोगीमधून फिरत असून रेल्वेप्रवाशांना याबाबत सूचना दिल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com