Adventurous चा आनंद घ्यायचा आहे?, मग एकदा 'या' रोडवरुन जरुर Long Drive करा..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : आपलं आयुष्य परीपूर्ण जगण्यासाठी प्रत्येकजण लाँग ड्राईव्हसाठी अधिक उत्साही असतो. लोक आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. टू-व्हिलर अथवा कारसह एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करतात. दरम्यान, त्यांचे असे म्हणणे आहे, की यामुळे त्यांना शहरास जवळून ओळखण्याची आणि स्थानिक पाककृतीची चव चाखण्याची संधी मिळते. तथापि, असे काही लोक आहेत, ज्यांना साहसी स्टंट करायला फार आवडते. यासाठी ते लाॅंग ड्राईव्हचा स्वीकार करतात. जर तुम्हालाही धोकादायक रस्त्यांवरून वाहन चालवायचे असेल, तर एकदा या रस्त्यावरुन नक्की गाडी चालवा. तज्ञांच्या मते, या रस्त्यांवर वाहन चालविण्यास विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे. चला, तर मग जाणून घेऊयात या धोकादायक रस्त्याबद्दल.. 

Three Level Zigzag Road

हा रस्ता सिक्कीममध्ये आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 11200 फूट इतकी असून या रस्त्यावर 100 पेक्षा जास्त हेयरपीनसारखी वक्र वळणे आहेत. यासाठी Three Level Zigzag Road वर वाहन चालविणे अत्यंत अवघड आहे. तसेच, या रस्त्यावर वाहन चालविण्यास परवानगी देखील आवश्यक आहे. परंतु, हृदयविकाराच्या रूग्णांना या रस्त्यावर कोणतीही परवानगी नाही. येथूनच आपण हिमालयातील अनोखी दृश्ये देखील पाहू शकता.

कोल्ली हिल

कोल्ली हिल्स तामिळनाडूपासून अवघ्या 47 किलोमीटर अंतरावर आहे. या टेकड्या अत्यंत धोकादायक आहेत. या कोल्ली हिल्सवर 70 हून अधिक वळणे आहेत, ज्यातून वाहन चालवणे खूपच अवघड आहे. या टेकडीला 'मृत्यूची दरी' असेही म्हणतात. तथापि, येथील घनदाट जंगल आणि सुंदर खोरे डोंगरांच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत.

रोहतांग पास

रोहतांग पास हे नाव आपण ऐकलेच असेल. मनालीपासून 53 कि.मी. अंतरावर रोहतांग आहे. या रस्त्यावर अनेक वक्र वळणं असून हे उत्तर भारतातील सर्वात उंच शिखरावर वसलेलं आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान रोहतांग पास खुला करण्यात येतो. यानंतर हिमवृष्टीमुळे रस्ता बंद केला जातो. या रस्त्यावर काळजीपूर्वक ड्राइव्ह करणे अनिवार्य आहे. याशिवाय तुम्ही मुन्नार रोड, चांग-ला, नॅशनल हायवे-22 इत्यादी रस्त्यांवरील साहसी रस्त्यांचा आनंदही घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com