भारतीय रेल्वे करवणार अयोद्धापासून रामेश्वरमपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या संपूर्ण पॅकेज

रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचे असेल. आज आपण या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
tourism
tourismsakal

सध्या उन्हाळ्यात टूरचा प्लॅन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण रेल्वेने प्रवासप्रेमींसाठी एक मोठी संधी आणली आहे. भारतीय रेल्वे 21 जूनपासून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू करणार आहे. ही ट्रेन केवळ रामायण यात्रेसाठी चालवली जाणार आहे. ही टुरिस्ट ट्रेन भगवान रामाशी संबंधित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणांना भेट देणार. रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचे असेल. आज आपण या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

tourism
एकदा चढावी मुंबई हायकोर्टाची पायरी!

या 18 दिवसांच्या यात्रेतील पहिले स्थळ रामजन्मभूमी अयोध्या असेल. यानंतर बक्सर येथील विश्वामित्र आश्रम आणि रामरेखा घाट येथे गंगा स्नान होणार. यानंतर ही स्पेशल ट्रेन सीतामढीला पोहोचेल, त्यानंतर अखेरीस माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर येथे भेट दिली जाईल. या स्पेशल ट्रेनचा पुढचा स्टॉप भोळे शहर काशी असेल. जेथे पर्यटक प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट येथील मंदिरांसह धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील.

tourism
लोणावळ्याची 'मगनलाल चिक्की' आणि रेल्वेचं खास कनेक्शन...

चित्रकूटनंतर ही गाडी भाविकांना थेट नाशिकच्या पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाईल. नाशिकनंतर हंपी या प्राचीन किष्किंधा शहरात भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. येथे प्रवाशांना अंजनी पर्वतातील हनुमानाचे जन्मस्थान पाहता येणार. हंपीहून रामेश्वरमला पोहोचल्यावर तुम्हाला शिव मंदिर आणि धनुषकोडी पाहण्याची सुद्धा संधी मिळेल.

शेवटी ही ट्रेन तेलंगणातील भद्राचलम येथे थांबेल. विशेष म्हणजे ही ट्रेन सुमारे 8000 किमीचा प्रवास पूर्ण करून 18 व्या दिवशी दिल्लीला परतेल.

tourism
Photos: ताजमहालशी संबंधित 'या' गोष्टी अनेकांना माहीत नाहीत...

पॅकेज किंमत

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला एसी डबे असतील. पर्यटकांना फक्त शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाईल. 18 दिवसांच्या या प्रवासासाठी तुम्हाला एकूण 62,370 रुपये मोजावे लागतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पॅकेज तुम्ही हप्त्यांवर देखील घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायणात प्रवास करणाऱ्यांनी पूर्ण लसीकरण केले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com