

Can we go to Vasota Fort alone : वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. अशा अत्यंत निसर्गरम्य पण तेवढ्याच दुर्गम ठिकाणी हो किल्ला वसलेला आहे.
वासोटा किल्ल्याचा इतिहास
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचं नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झालं असावं, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचं नाव महाराजांनी व्याघ्रगड असं ठेवलं. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत.
जायचं कसं?
साताऱ्याहून कास पठारमार्गे बामणोली गावात जायचे. पुण्याहून शक्यतो रात्रीचा प्रवास केल्यास सकाळी बामणोलीला पोचून दिवसभरात वासोटा बघून संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू करता येतो.
वासोट्याला एकट्यानं जावं का?
हा किल्ला ट्रेकींग करणाऱ्यांचा आवडता असल्याने इथे कायमच ग्रुप जात असतात. शिवाय किल्ला दूर्गम असून जंगली जनावर असणाऱ्या जंगलातून रस्ता जातो. त्यामुळे इथं एकट्यानं जावं का हा प्रश्न अनेकांना पडतो.
इथं एकट्यानं जाणं शक्य आहे. पण जंगल घनदाट असल्यानं तिथं अस्वलंही आहेत.
शिवाय मध्ये नदी लागतं. ती बोटीतून पार करावी लागते. ही बोट एकट्यासाठी जात नाही.
पण तरीही तुम्ही एकटेच जाणार असाल तर वाटेत बरेच ट्रेकींग ग्रुप भेटतात. त्यांच्या सोबतीनं जाता येईल.
सकाळी ७ वाजेदरम्यान जाऊन संध्याकाळी लवकर खाली यावं.
वर खाण्या-पिण्याची सोय नसल्याने स्वतःची सोय स्वतः सोबत न्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.