Viral Video: फूड ब्लॉगरने चक्क वटवाघळाचं सूप प्यायलं, व्हिडिओ व्हायरल होताच झाली अटक

या व्हिडीओमध्ये एक फुड ब्लॉगर महिला चक्क वटवाघळाचं सूप पिताना दिसतेय.
viral video
viral videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक थक्क आणि आश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक फुड ब्लॉगर महिला चक्क वटवाघळाचं सूप पिताना दिसतेय. सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ही महिला थायलंडची असून तिने वटवाघळाचं सूप पितानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला होता. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला शिक्षिका असून या महिलेला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही महिला वटवाघुळचे सूप पिताना दिसत आहे. ती या सूपला अत्यंत स्वादिष्ट असल्याचे व्हिडीओत सांगतेय. ती सांगतेय की वटवाघूळाच्या नखांचा वास हा उंदरासारखा येतोय. ती पुढे म्हणाली की ती कोणताही कोरोना संसर्ग पसरण्याचा प्रयत्न करत नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेला वटवाघुळचे सूप पिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

viral video
Viral Video : लोकलमध्ये चौथ्या सीटवरून वाद, दोन गटांत तुंबळ हाणामारी!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com