Video: पोपटाने पत्रकाराला छळले, व्हिडीओ पहाल तर हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल.
video
videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक मजशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका पत्रकाराचा हा मजेशीर व्हिडीओ आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लाईव्ह रिपोर्टींग करताना पत्रकाराला पोपट छळत असतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल.

video
Global News : परदेशी पुतना मावशी; सात अर्भकांचा बळी घेतला, १० जणांच्या खूनाचा प्रयत्न

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टींंग करत असतो आणि अचानक मागून पोपट येतो आणि त्याच्या खांद्यावर बसतो. पोपट इतक्यावरच थांबत नाही. तर पत्रकाराला छळत असतो मात्र लाईव्ह रिपोर्टींग करताना पत्रकार काहीच करू शकत नाही.

मग काय? तर पोपट चक्क पत्रकाराच्या कानातला इअरफोन काढून सोबत घेऊन जातो. तरीसुद्धा पत्रकाराला काहीही करता येत नाही. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंंड व्हायरल होत आहे.

video
Video : जशी करणी तशी भरणी, नियतीनं शिकवला चांगलाच धडा

लाईव्ह रिपोर्टींग संपल्यानंतर पत्रकारानं इअरफोन शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही अंतरावर त्याला इअरफोन सापडतो. सध्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com