Agra : रसगुल्ला न दिल्यामुळं लग्नात तुफान राडा; चाकू, खुर्च्यांनी हाणामारी, 12 जण जखमी, एकाचा मृत्यू

आग्र्यात एका रसगुल्ल्यावरून दोन वऱ्हाडी मडळींमध्ये मोठा वाद झाला आहे.
Wedding Ceremony Agra Uttar Pradesh
Wedding Ceremony Agra Uttar Pradeshesakal
Summary

आग्र्यात एका रसगुल्ल्यावरून दोन वऱ्हाडी मडळींमध्ये मोठा वाद झाला आहे.

आग्रा : उत्तर प्रदेशातील ताज शहर आग्रा (Agra Uttar Pradesh) इथं एका रसगुल्ल्यावरून (Rasgulla) दोन वऱ्हाडी गटांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चाकूच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर वधूला न घेता वऱ्हाडी माघारी परतले. गोंधळ आणि मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दुसरीकडं तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण शहरातील एतमादपूरमधील आहे. येथील खंडौली इथं राहणारे व्यापारी वकार यांचा मुलगा जावेद आणि रशीद यांचं लग्न याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या उस्मान यांच्या मुली जैनब व साजिया यांच्याशी निश्चित झालं होतं. एतमादपूर येथील विनायक भवन इथं बुधवारी दोघांचा विवाह होणार होता.

Wedding Ceremony Agra Uttar Pradesh
Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय

वऱ्हाडीनं एकापेक्षा जास्त रसगुल्ले मागितले अन्..

दरम्यान, वऱ्हाडी मंडळी तिथं पोहोचल्यावर मुलीच्या बाजूच्या लोकांनी वऱ्हाडींचं स्वागत केलं. वऱ्हाडी मंडपात गेल्यावर तिथं रसगुल्ले दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं. एका वऱ्हाडीनं एकापेक्षा जास्त रसगुल्ले मागितले असता, काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणानं नकार दिला. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. काही वेळातच हा वाद इतका वाढला की, रसगुल्ल्यासाठी चाकू, सुऱ्या निघाल्या.

Wedding Ceremony Agra Uttar Pradesh
Cylinder Explosion : औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट; आगीत 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर

'वऱ्हाडींचं महिलांसोबत असभ्य वर्तन'

या वादात लग्नासाठी आलेला 20 वर्षीय सनी हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रसगुल्ला न दिल्यामुळं दोन्ही बाजूंनी वादावादी सुरू झाली आणि प्रकरण इतकं वाढलं की चाकू, काट्या आणि खुर्च्या फेकून मारण्यात आलं. महिला व ज्येष्ठांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकलं नाही. काही वेळातच लग्नाच्या वातावरणाचं शोकाकुलात रुपांतर झालं. लग्नात झालेल्या गदारोळात शाहरुख, निजाम, शकील, जानू, रहमान, रामिया, खंडौली येथील रहिवासी असे 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत. वादानंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुसरीकडं मयत सनीच्या काकांनी आरोप केलाय की, 'नराधमांनीही महिलांसोबत असभ्य वर्तन केलं. एवढंच नाही तर त्यांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com