Viral : हे फक्त एक बहिणच करू शकते! Video पाहून आपल्या बहिणीची आठवण येईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

Viral : हे फक्त एक बहिणच करू शकते! Video पाहून आपल्या बहिणीची आठवण येईल

लहान मुले खूप निरागस असतात. तर अनेकदा बहिण आपल्या लहान भावाची जबाबदाऱ्या पार पाडत असते. सध्या दोन लहान चिमुकल्या मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती मुलगी आपल्या लहान बहीणीला ज्या प्रकारे मदत करते ते पाहून आपल्याला आपल्या बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ परदेशातील असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. तर आपल्या लहान बहिणीला सायकलवर बसण्यासाठी मोठी बहिणी खाली वाकून बसते आणि लहान बहिण तिच्या पाठीवर उभा राहून सायकलवर बसते. तर हा भावनिक व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.