Viral Video : म्हणून कुत्र्याला इमानदार म्हणतात; पाळण्यातल्या बाळाला सापापासून असं वाचवलं

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.
Viral Video
Viral Video Sakal

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, लग्न, अपघात अशा व्हिडिओचा सामावेश असतो. तर काही व्हिडिओ आपल्याला जीवनात मोठा धडा शिकवून जात असतात. सध्या अशाच दोन कुत्र्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे एका लहान बाळाला सापाच्या हल्ल्यापासून वाचवताना दिसत आहेत. बाळ पाळण्यात झोपलेलं असताना एक साप पाळण्याजवळ आल्यानंतर घरातील दोन कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि बाळाला वाचवले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

दरम्यान, या आधी तुम्ही कुत्र्याचे वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील पण हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कुत्रा इमानदार असल्याची जाणीव होईल. "म्हणूनच कुत्र्याला इमानदार प्राणी म्हणतात" अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर ट्वीटरवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com