Viral Video: फेमस होण्यासाठी पोरीनं केला भर रस्त्यात राडा, मात्र भलत्याच कारणाने व्हिडीओ व्हायरल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: फेमस होण्यासाठी पोरीनं केला भर रस्त्यात राडा, मात्र भलत्याच कारणाने व्हिडीओ व्हायरल...

Girl Viral Video: हल्ली सोशल मीडियावर गाणी आणि गाण्यांवर तरुण वर्गाकडून बनवल्या गेलेल्या रिल्स प्रचंड व्हायरल होतात. असाच एका तरूणीचा दिलबर गाण्यावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडीओ तरूणीच्या डान्समुळे नाही तर भलत्याच कारणाने व्हायरल होतोय. व्हिडीओमधील काकांच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणी दिलबर गाण्यावर नाचताना तुम्हाला दिसून येईल. मात्र तिच्यामागे नाचणाऱ्या काकांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या पाठीमागे तिचा डान्स बघत काकाही स्टेपवाईज डान्स करताना दिसून आले. अनेकांना त्यांच्या डान्सचं कौतुक वाटलं. खरं तर हा व्हिडीओ तरूणीच्या पाठीमागे डान्स करणाऱ्या त्या काकांमुळे व्हायरल झालाय.

एका नेटकऱ्याने तर काकांची चांगली कंपनी मिळाली असा कमेंटही या व्हिडीओवर केलाय. तर एकाने काका मद्यपान करून नाचताय असेही म्हटले आहे. काहींनी मुलीपेक्षा काका चांगले नाचताय असेही म्हटले आहे.