Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याला उभारलेल्या गुढीला कडूनिंबाचा पाला का वाहतात? वाचा कारण

गुढी पाडव्याला कडूनिंबाची पानं का खातात माहितीये?
Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023esakal

Gudi Padwa 2023 : भारतीय सणांतील एक महत्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा. मराठी माणसाचं नवं वर्षच जणू. पण गुढी पाडव्याला कडूनिंबाची पानं का खातात माहितीये? त्यामागेही विशेष कारण आहे. तसेच कडूनिंबाच्या पानाचे बरेच फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

उन्हाळा लागला की हवामानात लगेच बदल होतो. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आहाराशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पाडवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस. या दिवशी उभारणाऱ्या गुढीला कडूनिंबाचा पाला लावला जातो.

Gudi Padwa 2023 Facts of using Kadunimb
Gudi Padwa 2023 Facts of using Kadunimb

पाडवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस असल्याने वातावरणात विशेष बदल होतात तेव्हा या बदलांशी जुळवून घेण्यासाठी कडूनिंब आपल्याला अनेक आरोग्यदायी कारणांसाठी महत्वाचा आहे. चला तर कडूनिंबाच्या पाल्याचे फायदे जाणून घेऊया.

कडूनिंबाचा पाला आरोग्यासाठी इतका फायद्याचा आहे की त्याला आंघोळीच्या पाण्यात देखील घातला जातो. वाचा कडूनिंबाचे आणखी फायदे

१. त्वचेसाठी फायदेशीर

कडूनिंब जंतुघ्न असल्याने कोणत्याही त्वचाविकारात कडूनिंबाच्या पाल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचाविकार दूर होण्यास मदत होते. बरेचदा थंडीने किंवा जास्त उष्णतेने त्वचा कोरडी पडते. अशावेळी कडूनिंबाच्या तेलाचा त्वचेवर वापर केल्यास निश्चितच फायदा होतो.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याआधी आजच घरात करा हे बदल, घरात नांदेल सुखसमृद्धी अन् पैशांची भरभराट...

२. कफ आणि उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त

कडूनिंबाची चव अतिशय कडू असते. बदलत्या हवामानात सर्दी-कफाचे विकार वाढतात. आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये कडूनिंबाचा वापर केला जातो. तसेच कडूनिंब शीत प्रकृतीचा असल्याने उष्णतेच्या विकारांसाठीही कडूनिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते. यामुळे उष्णतेचे विकार नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. मधुमेह रूग्णांसाठी फारच फायदेदायी

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील ही साखर नियंत्रणात राहावी यासाठी कडूनिंब अतिशय फायदेशीर असतो. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Gudi Padwa 2023
Neem Benefits : कडूलिंबाचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

४. रक्त शुद्धीसाठी उपयुक्त

रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुलिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. कडूनिंब हा रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. पोटातून काढा दिल्यास त्याचा फायदा होतो. (Gudi Padwa)

५. केसांच्या सौंदर्यासाठी

महिलांमध्ये केस गळणे, केसांत कोंडा होणे, उवा किंवा लिखा होणे अशा समस्या वारंवार उद्भवताना दिसतात. अशावेळी कडूनिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास या समस्या दूर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या समस्यांसाठीही कडूनिंब उपयुक्त असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com