MUMBAI LOCAL VIRAL VIDEO
esakal
PASSENGERS PANIC IN PANVEL TO CSMT AC LOCAL TRAIN VIRAL VIDEO: मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलला ओळखलं जातं. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. दरम्यान पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या एका वातानुकूलित लोकलमध्ये एक अजब प्रकार घडलाय. ही लोकल एकामागून एक स्टेशन मागे टाकत होती, परंतु ती कोणत्याच स्थानकावर थांबत नव्हती. जेव्हा हा सगळा प्रकार लोकमधील प्रवाशांच्या लक्षात आला तेव्हा भितीचं वातावरण पसरलं.