Video: वृद्धाने मेट्रोतंच दुसऱ्या मुलीसोबत केला कपल डान्स; वृद्ध पत्नी उठली अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: वृद्धाने मेट्रोतंच दुसऱ्या मुलीसोबत केला कपल डान्स; वृद्ध पत्नी उठली अन्...

एका वृद्ध व्यक्तीचा मेट्रोलीत कपल डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक वृद्ध व्यक्ती आणि एक तरूणी कपल डान्स करत असून हा व्हिडिओ सध्या अनेकांकडून शेअर केला जात आहे. पण या डान्सनंतर वृद्ध व्यक्तीच्या पत्नीने जे काय केलं त्यावरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(Old Man Young Man Couple Dance in Metro Viral Video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या व्हिडिओमध्ये वृद्ध जेव्हा डान्स करण्यासाठी उठतो त्यावेळी तो त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या पत्नीला डान्ससाठी बोलावतो पण ती त्याच्यासोबत डान्स करण्यास मनाई करते. त्यानंतर तो वृद्ध व्यक्ती तिथे उभी असलेल्या एका तरूणीसोबत कपल डान्स करतो. हे पाहून मेट्रोमध्ये हशा पिकल्याचं या व्हिडिओत दिसतंय.

हे पाहून वृद्ध महिला उठते आणि तिच्या शेजारी बसलेल्या एका पुरूषासोबत कपल डान्स करते. हा पाहून लोकं चक्क ओरडू लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Video: आईचा डान्स अन् पोरगं करतंय शूट; पण त्याने वेगळंच केलं

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :Videodanceviral video