Selfie Viral Video
Selfie Viral Videoesakal

Selfie Viral Video : सेल्फीचा नादच वाईट; वाघासोबत फोटो घेण्याच्या पायी अस्वलाच्या तावडीत सापडली!

हल्ली लोक सेल्फीच्या नादात आपली जीव सुध्दा धोक्यात घालतात. त्यामुळे फोटो महत्वाचा की, जीव महत्वाचा असा प्रश्न सहाजिकच पडतो.

Selfie With Wild Animal Viral Video : हल्ली तरुणांमध्ये सेल्फीची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. पण बऱ्याचदा हा सेल्फीचा नाद त्यांना फार जीवघेणा ठरू शकतो. लोक सेल्फीच्या नादात आपली जीव सुध्दा धोक्यात घालतात. त्यामुळे फोटो महत्वाचा की, जीव महत्वाचा असा प्रश्न सहाजिकच पडतो. असाच एक व्हिडीओ सध्या फार व्हायरल होत आहे.

ज्यात एक मुलगी प्राणीसंग्रहालयात जंगली जनावरांसोबत सेल्फी काढण्याच्या नादात पिंजऱ्याच्या फार जवळ जाते. आणि मग इकडे आड आणि तिकडे विहिर अशी तिची गत होते. हे तुम्ही या व्हिडीओत पाहू शकतात.

Selfie Viral Video
Viral Video: फूड ब्लॉगरने चक्क वटवाघळाचं सूप प्यायलं, व्हिडिओ व्हायरल होताच झाली अटक

वाघाच्या पिल्लासोबत सेल्फी काढण्याच्या नादात ही मुलगी विसरली की मागे अस्वलाचा पिंजरा आहे. आणि पिंजऱ्याच्या जवळ जाताच अस्वलाने मागनं तिचा ड्रेस धरून तिला खेचलं. यामुळे घाबरू मुलगी ओरडायला लागली. पण त्याचवेळी जवळ असणाऱ्या व्यक्तीने तिला ओढत तिथून दूर केलं आणि अनर्थ टळला. हे सगळं बघितल्यावर बघणाऱ्यांना हसावं की, रडावं हेच कळत नव्हतं.

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या व्हिडीओला हजारो लोकांनी बघितला आणि लाइक केलं आहे. तर कहींनी जीवन अनमोल आहे, त्या असं वेडेपणाने गमवू नका असा सल्लाही दिला आहे. एकाने हा शुध्द मुर्खपणा आहे अशी कमेंट केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com