Smita Patil: अशी प्रतिभावान स्मिता पून्हा होणे नाहीच!

तू प्रतिभावान, तू कणखर, तू शारदा, तू प्रगल्भ. अर्थात स्मिता पाटील. ७०-८० च्या दशकातील एक हरहुन्नरी अभिनेत्री जी पुन्हा होणे नाहीच. याच प्रतिभासंपन्न अभिनेत्रीची आज जयंती.
Smita Patil
Smita PatilEsakal

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. वृत्तनिवेदन करण्याचा त्यांचा अंदाजही निराळा होता. कार्यक्रम सुरू होण्याआधी त्या जीन्सवर झटपट साडी नेसायच्या आणि कॅमेऱ्यांसमोर उभ्या रहायच्या. स्मिता पाटील यांनी आपल्या १० वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल ८० सिनेमात काम केले. ‘भूमिका’ आणि ‘चक्र’ या सिनेमांसाठी स्मिता यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

१९८५ मध्ये त्यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज अभिनेत्री स्मिता पाटील आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या नावाने आज अभिनेत्रींना ‘स्मिता पाटील पुरस्कार’ दिला जातो. अभिनयाबरोबरच त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. स्मिता एक उत्तम फोटोग्राफर होत्या.

Smita Patil
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचे लग्न हे त्याकाळी संपूर्ण सिनेसृष्टीसाठी चर्चेचा विषय ठरले होते. कारण राज हे विवाहित होते. त्यामुळे स्मिता यांच्या घरातूनही त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण अखेर राज यांनी आपले राहते घर सोडून स्मिता यांच्याशी दुसरा विवाह केला. मुलगा प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसांनंतर वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांचा मृत्यु झाला. स्मिता यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द ही जरी १० वर्षांची असली, तरी त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

Smita Patil
Recipe: घरच्या घरी कशी तयार करायची केळीची कचोरी?

श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने स्मिता यांना ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

‘मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.

Smita Patil
Diwali Recipe: घरच्या घरी शेव कसे तयार करायचे?

स्मिताजी यांच्या डोळ्यातील चमक, अभिनयातील सहजता आणि निखळ हास्य. पावसात भिजलेल्या हिरव्या पानावर डोलणाऱ्या मोगऱ्याच्या नाजूक कळीसाखं सौंदर्य आहे. हे सगळंच सध्याच्या पिढीला स्वत:कडे खेचून घेणारे आहे. त्यांचे अर्थपूर्ण चित्रपट आणि अभिनयातील सहजता हे सर्वच लक्ष्यवेधी आहे. त्यांचा ‘मंडी’ चित्रपटातील स्मिता आणि अमरीशपुरी यांच्यातील संवाद जगण्याची एक प्रेरणा देतो. पिंजऱ्यात बंद असलेल्या पोपटाला अमरीशजी सोडून देतात तेव्हा स्मिताजी म्हणतात,

Smita Patil
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

स्मिता : 'ये क्या कर रहे हो तुम'

अमरीशजी : पिंजरे का दरवाजा खोल राहा हु

स्मिता : 'पिंजरे के बाहर जिंदा रह सकेगा?'

अमरीशजी : अंदर भी तो मरेगा एक दिन, उडने की कोशिश मे अपनी पेहेचान पा जाये शायद..

या चित्रपटातील निरागस स्मिता अगदीच मनाला भावते.

Smita Patil
Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी सोप्या पद्धतीने कुरकुरीत चकली कशी बनवायची ?

असाही योगायोग

राज बब्बर आणि स्मिताजी यांच्या अभिनयाने परिपूर्ण झालेला हा एक चित्रपट. या चित्रपटाचे कथानकात जो शेवट घडला तसाच स्मिताजींच्या खऱ्या आयुष्यात झाले हे दुर्दैवच म्हणावे लागेल. स्मिताजी या चित्रपटात बाळंतपणावेळी जगाचा निरोप घेतात, असे दाखवण्यात आले. खऱ्या आयुष्यातही तसेच घडले. प्रतिकच्या जन्मानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Smita Patil
सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या स्मिता पाटील

कोणाचेच भविष्य उज्वल हे संघर्षाशिवाय होत नाही असे म्हटले जाते. आपला संघर्षाचा काळ प्रत्येकजण बोलून दाखवतो. पण, स्मिताजी मात्र याला अपवाद ठरल्या. जन्म महाराष्ट्रातील खानदानी कुटुंबातील, वडीलही मोठे राजकीय नेते त्यामुळे घरची परिस्थितीही अतिशय चांगली होती. त्यांचे शिक्षणही चांगल्या पद्धतीने झाले होते. पण, याउलट चित्रपटात मात्र त्यांनी नेहमीच समाजातील गरीब, उपेक्षित अशा महिलांच्या भूमिका अतिशय समर्थपणे केल्या. यातील, उंबरठा, जैत रे जैत, पेट प्यार और पाप, मिर्च मसाला, चक्र यासारखे चित्रपट आवर्जून पाहावेत असे आहेत.

Smita Patil
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूयॉर्क, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचचे ‘सिंहावलोकन ‘ झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. अशा सुप्त कलागुणांनी बहरलेल्या स्मिता पाटील यांना मानाचा मुजरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com