

Train Toilet No Water Forces 24 Passengers to Disembark
esakal
Shivamogga Consumer Commission Orders Railway Compensation : बेंगळुरूहून शिवमोग्गाला प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला रेल्वेगाडीतील शौचालयांमध्ये पाणी नसल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. तुमकुरु रेल्वे स्थानकावर तक्रार करूनही मदत न मिळाल्याने २४ जणांच्या या गटाला गाडीतून उतरून दुसऱ्या रेल्वेगाडीने प्रवास करावा लागला. यासाठी त्यांना १,७६० रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला. या प्रकरणाची दखल घेत शिवमोग्गा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रेल्वे प्रशासनाला एकूण १६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा