ट्रेडमिल डान्सरचा नादखुळा! पठ्ठ्याचा व्हिडिओ तर पाहा व्यायाम करायचा विसरुन जाल : Treadmill Dance Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Treadmill Dance Viral Video: ट्रेडमिल डान्सरचा नादखुळा! पठ्ठ्याचा व्हिडिओ तर पाहा व्यायाम करायचा विसरुन जाल

वजन कमी करण्यासाठी आणि हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी जिममध्ये ट्रेडमिलचा वापर तुम्ही केला असेल पण याच ट्रेडमिलवरचा डान्स कधी पाहिलात का? खरंतरं डान्स हा देखील आरोग्यासाठी चांगला व्यायाम आहे, पण तो थेट ट्रेडमिलवर!

ट्रेडमिलवर डान्स करणाऱ्या एका तरुणाचा भन्नाट व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या टॅलेंटला सलाम करालं. (Treadmill Dance Viral Video If you watch a this video you will forget to exercise)

हेही वाचा: Legislative Council Elections: पदवीधर निवडणुकीसाठी मविआची रणनीती! कोण कुठल्या जागेवर लढणार? जाणून घ्या

खरंतरं हा व्हिडिओ म्हणजे रिल्स असून तो @alok_speed_b_boy या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर अशा प्रकारचे अनेक ट्रेडमिल डान्सचे व्हिडिओ असून ते ही तुम्ही पाहाल तर तुमची तब्येतच खूश होईल.

हेही वाचा: Flights Shutdown in USA: अमेरिकेत विमानसेवा ठप्प झाल्याचा भारतातील उड्डाणांवर होणार परिणाम? DGCAनं दिलं स्पष्टीकरण

या व्हिडिओमध्ये एक तरुण सुरुवातीला ट्रेडमिलवर धावताना दिसतो नंतर तो हळूहळू डान्सच करायला लागतो. बरं हा डान्सही उगाच चित्रविचित्र नाही तर अत्यंत लयबद्ध असा बरं का! त्याचमुळं या डान्सचा प्लॅटफॉर्म अन् हटके परफॉर्मन्स याच्या तुम्ही अक्षरशः प्रेमात पडता.

हेही वाचा: US flights news: मोठा दिलासा! अमेरिकेत विमान उड्डाणांना टप्प्याटप्प्यानं सुरुवात

पण हा डान्स पाहताना तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो जरुर घ्या पण तसा प्रयत्न करण्याच्या फंदात पडू नका. कारण हे खूपच धोकादायक आहे. जर तुम्ही ट्रेडमिल सुरु करुन डान्सचा पयत्न करायला गेलात तर ट्रेडमिलवर पडाल आणि तुम्हाला गंभीर इजाही होऊ शकते. त्यामुळं हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणून पहायला हरकत नाही, पण तसा प्रयत्न चुकूनही करु नका!!

टॅग्स :viral video