लग्नासाठी Software Engineer Ban? 'कृपया कॉल करू नका...' matrimonial Siteची ती ad चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Matrimonial Ad

लग्नासाठी Software Engineer Ban? 'कृपया कॉल करू नका...' matrimonial Siteची ती ad चर्चेत

अलीकडे अनेक वैवाहिक जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. कधी वर वधूंच्या हास्यास्पद मागण्यांमुळे तर कधी मूर्खपणाच्या मागण्यांमुळे या वैवाहिक जाहिराती व्हायरल होत असतात. अलीकडेच एका matrimonial Siteच्या जाहिरातीचा एक फोटो भन्नाट व्हायरल होतोय. इंजिनीयर्सच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारी खरं तर ही पोस्ट आहे. मात्र ही व्हायरल पोस्ट जो ही वाचेल त्याला आधी हसू यावं अशी ही पोस्ट आहे.

साधारणत: वर वधूंसाठीच्या जाहिरांतींमध्ये धर्म, जात, शैक्षणिक पात्रता या गोष्टींबाबत माहिती देण्यात येते. मात्र या जाहिरातीतला वेगळेपणा म्हणजे या जाहिरातीच्या शेवटी 'कृपया सॉफ्टवेअर इंजिनीयर्स कॉल करू नका' असे लिहीले होते. एकीकडे ही पोस्ट सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या भविष्यावर टांगती तलवार असल्याचे भाष्य करते तर दुसरीकडे ज्या कुटुंबाने या मॅट्रिमोनीअल साईटमार्फत ही जाहिरात दिली होती त्यांना सॉफ्टवेअर इंजिनीअरचा राग असावा असे दर्शवते.

हेही वाचा: Viral: शाब्बास! शारीरिक सुख नाही तर शांततेच्या शोधात पठ्ठयाने ४३ वर्षात केले ५३ लग्न

काय होती ती जाहिरात?

"वर पाहिजे, हिंदू पिल्लई NV 24/155 गोरी MBA, श्रीमंत कौटुंबिक व्यवसाय असणारी सुंदर मुलगी IAS/IPS, कार्यरत डॉक्टर (PG), एकाच जातीतील उद्योगपती/व्यापारी माणूस”. वरात आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या वर्णनाव्यतिरिक्त, शेवटी एक विभाग होता ज्यामध्ये असे म्हटले होते, (सॉफ्टवेअर अभियंते कृपया कॉल करू नका)”

हेही वाचा: Viral Video : 'सामी सामी...' गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड

ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतेय. इंजिनीअर मुलगा वर म्हणून का नको? विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीअर याबाबतचा संभ्रम कायम ठेवणारी ही पोस्ट आहे.

Web Title: Viral Matrimonial Ad Kindly Dont Call Software Engineer Mentioned In It Read Once

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..