Video : दोन बायका फजिती ऐका! अंध भिकाऱ्याने केली 2 लग्न अन् पुढे जे झालं...धक्कादायक घटना व्हायरल

एका अंध भिकाऱ्याची अनोखी तक्रार चर्चेचा विषय ठरली आहे. दोन पत्नींच्या सततच्या भांडणामुळे कमाईवर परिणाम होत असल्याने कलेक्टरकडे गार्‍हाणं दाखल.
Beggar files complaint two wife
Beggar files complaint two wifeesakal
Updated on
Summary
  • अंध भिकाऱ्याने दोन पत्नींच्या भांडणाची तक्रार कलेक्टरकडे केली.

  • पत्नींच्या वादामुळे त्याच्या भीक मागण्यावर आणि कमाईवर परिणाम होत आहे.

  • कलेक्टरांनी प्रकरण महिला व बालविकास विभागाकडे समुपदेशनासाठी सुपूर्द केले.

सामान्य जनतेसाठी आयोजित केलेल्या जनसुनावणीमध्ये एक असा प्रसंग घडला की उपस्थित अधिकाऱ्यांना क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचले नाही. मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील जनसुनावणीत एक दिव्यांग भिकारी आपली व्यथा मांडण्यासाठी आला आणि त्याने केलेली तक्रार ऐकून जिल्हाधिकारींसह उपस्थित सर्वच अधिकारी शॉक झाले.

Beggar files complaint two wife
Nag Panchami Shirala Video : भस्म..गळ्यात कवट्यांची माळ..! शिराळ्यात अवतरले नागा साधू, सुरू झाली थरारक नागपंचमीची मिरवणुक, VIDEO
esakal

शफीक शेख नावाचा एक अंध भिकारी जनसुनावणीत पोहोचला. त्याने सांगितले की, त्याच्या दोन पत्नी आहेत पहिली पत्नी शबाना, ज्याच्याशी त्याचे २०२२ मध्ये लग्न झाले आणि दुसरी पत्नी फरीदा, जी त्याच्याशी २०२४ मध्ये विवाहबद्ध झाली. परंतु या दोघींमध्ये सतत वाद होतात, भांडणं इतकी टोकाला जातात की घरात शांतता राहात नाही. या भांडणाचा थेट परिणाम शफीकच्या "व्यवसायावर", म्हणजेच भीक मागण्यावर होत आहे.

शफीक म्हणतो, "मी दोघींनाही प्रेम करतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. दररोज दोन ते तीन हजार रुपये कमावतो. परंतु, घरात सतत कलह असल्यामुळे मी वेळेवर भीक मागायला जाऊ शकत नाही. यामुळे माझ्या कमाईत घट झाली आहे." त्याने जिल्हाधिकाऱ्यांना आग्रहपूर्वक विनंती केली की, या दोघींमध्ये समजुत काढा, मला त्यांच्या भांडणातून मुक्त करा.

Beggar files complaint two wife
Mother Video : शेवटी आईचं काळीज! स्वतः भरधाव ट्रकखाली गेली; पण वाचवला बाळाचा जीव, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

शफीकची ही तक्रार ऐकून जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. जनसुनावणीत उपस्थित असलेले महिला आणि बालविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच इतर कर्मचारीही या प्रसंगाने गोंधळून गेले. मात्र, शफीकचा मुद्दा गंभीरतेने ऐकून घेत त्यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करत जिल्हाधिकाऱ्यांनी महिला आणि बालविकास विभागाला निर्देश दिले की, दोन्ही पत्नींचे समुपदेशन करण्यात यावे. त्यांच्या मनोवृत्ती समजून घेऊन त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. विभागाकडून यावर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Beggar files complaint two wife
Bomb Video : विमानात बॉम्ब अन् अल्लाह हू अकबर म्हणत प्रवाशाने दिली धमकी; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

शफीक शेखची ही अनोखी तक्रार आता संपूर्ण खंडवा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. एक भिकारी, ज्याचं उत्पन्न ऐकून अनेकजण चकीत होतात आणि त्याची कुटुंबव्यवस्था ऐकून अधिकच थक्क होतात. प्रशासनापर्यंत पोहोचून त्याने आपल्या अडचणी मांडल्या, हे पाहून अनेकजण म्हणतायत समस्या कुणाचीही असू शकते, पण काहीजणांची तर अगदी चित्रविचित्र असतात

FAQs

  1. Who is the beggar who filed the complaint?
    शफीक शेख नावाचा अंध भिकारी, जो खंडवा जिल्ह्यात भीक मागतो.

  2. What was the complaint made by the beggar?
    त्याच्या दोन पत्नी सतत भांडतात आणि त्यामुळे त्याला व्यवस्थित कमावता येत नाही.

  3. What action did the collector take?
    कलेक्टरांनी हा मामला महिला व बालविकास विभागाकडे तपासासाठी पाठवला.

  4. How much does the beggar earn daily?
    शफीक दररोज सुमारे दोन ते तीन हजार रुपये कमावतो.

  5. What does the beggar want?
    त्याला पत्नींपैकी कोणालाही सोडायचं नाही, फक्त त्या दोघींमध्ये समजूत व्हावी असं त्याचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com