Salman Khan Fan : भाईचा जबरा फॅन ! सलमानच्या बड्डेसाठी तब्बल ११०० किलोमीटर सायकलवर निघाला

सलमानच्या वाढदिवशी त्याला भेटण्याची इच्छा मनात घेऊन हा चाहता तब्बल ११०० किमीच्या प्रवासावर निघालाय
Salman Khan Fan
Salman Khan Fanesakal

Salman Khan Fan News: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खानची खास ओळख आहे यात काही शंका नाही. सलमान खानचे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात फॅन्स तुम्हाला दिसून येतील. सध्या त्याच्या एका फॅनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. सलमानच्या वाढदिवशी त्याला भेटण्याची इच्छा मनात घेऊन हा चाहता तब्बल ११०० किमीच्या प्रवासावर निघालाय.

सलमान खानच्या या चाहत्याचं नाव समीर आहे. मागल्या चार वर्षापासून समीर सलमानला भेटण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतो. मात्र यावेळी त्याने सलमानच्या भेटीसाठी भूक तहान बाजूला सारत चक्क ११०० किमीचा प्रवास सायकलने करण्याचे ठरवले आहे.

येत्या २७ डिसेंबरला सलमान खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी सलमानला भेटून त्याला शुभेच्छा देण्यासाठी समीर जबलपूरवरून निघालाय. गुरूवारपासून समीरने त्याचा प्रवास सुरू केलाय.

समीरची सायकल आहे फारच खास

समीर सलमानला भेटण्यासाठी संपूर्ण तयारीने घराबाहेर पडला आहे. त्याने त्याच्या सायकलला एक बॅटरी लावली आहे. ही बॅटरी त्याने स्पीकर, लाइट आणि फोनला कनेक्ट केली आहे. ज्यामुळे त्याचा प्रवास सोपा होण्याबरोबरच त्याचे मनोरंजनही होऊ शकेल.

Salman Khan Fan
Salman Khan: सलमान खानचं गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

यावेळी अनेकांनी समीरला त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. थंडीच्या काळात पाच दिवसांत ११०० किमीचा प्रवास सायकलने करणे ही समीरसाठी खरं तर फार आव्हानात्मक बाब असणार आहे. मात्र त्याचा निश्चय ठाम असून त्याला सलमानच्या वाढदिवसापर्यंत मुंबईत त्याच्या घरापर्यंत पोहोचायचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com