Viral Video: शाब्बास रे पठ्ठ्या... समोसा विकणाऱ्याने 18 वर्षी क्रॅक केली NEET, पाहा कशी केली तयारी

Viral Video: फिजिक्स वालाच्या अलख पांडे यांनी इंस्टाग्रामवर नोएडा येथील 18 वर्षीय समोसा विक्रेता सनी कुमारने मिळवलेले या यशाची पोस्ट शेअर केली आहे.
Samosa seller cracks NEET
Samosa seller cracks NEET Esakal
Updated on

भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG उत्तीर्ण करणाऱ्या एका 18 वर्षांच्या समोसा विक्रेत्याची प्रेरणादायी गोष्ट सध्या इंटरनेटवर अनेकांची मने जिंकत आहे.

फिजिक्स वालाच्या अलख पांडे यांनी इंस्टाग्रामवर नोएडा येथील 18 वर्षीय समोसा विक्रेता सनी कुमारने मिळवलेले या यशाची पोस्ट शेअर केली आहे.

फिजिक्सवालाचे अलख पांडे बहुतेक अशा विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी शेअर करतात जे सर्व अडचणींचा सामना करूनही आपली स्वप्ने पूर्ण करतात.

एका नव्या पोस्टमध्ये, त्यांनी नोएडातील समोसा विक्रेत्या सनीची गोष्ट शेअर केली आहे, ज्याने अंडरग्रेजुएट मेडिकल प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण केली.

अलख पांडे यांनी फिजिक्स वालाच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये विद्यार्थी सनी कुमारची खोली दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओत सनीच्या खोलीच्या भिंती नोट्सनी भरलेल्या दिसत आहेत.

अलख यांनी नोट्सकडे पाहत व्हिडिओला कॅप्शनही दिले की, "तुम्ही अशा नोट्स कधी पाहिल्या आहेत का?"

सनीने NEET 2024 च्या परीक्षेत 720 पैकी 664 गुण मिळवले आहेत. एका वर्षाच्या तयारीनंतर दिवसाचे ४-५ तास समोसे विकून त्याने हे यश मिळवले आहे.

Samosa seller cracks NEET
Nashik Viral News: अगदी चित्रपटात घडतं तसंच... छेड काढणाऱ्या टवाळखोरास तरुणींनी भर चौकात दिला चोप! VIDEO व्हायरल

अवघ्या 18 व्या वर्षी सनीने नोएडामधील त्याच्या छोट्याशा दुकानासह अभ्यास सांभाळला. शाळा संपवून दुपारी २ वाजता तो अभ्यास करायचा आणि त्याच्या समोशाच्या स्टॉलवर कामही करायचा. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांचा अभ्यास सुरू असायचा.

"कधीकधी मी रात्रभर अभ्यास करायचो, त्यामुळे सकाळी माझ्या डोळ्यात दुखायचे," असेही सनी व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचे दिसते.

Samosa seller cracks NEET
बापरे धक्कादायक! मुलींच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये लावले छुपे कॅमेरे, शेकडो व्हिडिओंची केली विक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com