Kohli vs Gambhir: कोहली-गंभीरमध्ये भरमैदानात राडा; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; सोशल मीडियावर Memes Viral

Kohli vs Gambhir Memes Viral
Kohli vs Gambhir Memes ViralSakal

Virat Kohli Gautam Gambhir Fight Video : आयपीएलमधील RCB आणि LSG या दोन संघातील सामन्यादरम्यान 1 मे च्या रात्री गदारोळ झाला. सामना झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर मीम्स व्हायरल झाले आहेत.

Kohli vs Gambhir Memes Viral
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यजमान लखनौ सुपरजायंट्सचा एकना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाला. या सामन्यादरम्यान विराट कोहली याची अनेक खेळाडूंशी किरकोळ बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर भांडणात झाले. यावेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली दोघेही आक्रमक झाले होते.

Kohli vs Gambhir Memes Viral
IPL 2023 : हात ओढला अन् विषय गेला भांडणापर्यंत... गौतम गंभीरच्या 'या' कृतीचा विराट कोहलीला आला राग

दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावर अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. झोमॅटोने अधिकृत ट्वीटरवरून भांडणाचा फोटो पोस्ट केला आहे.

त्यामध्ये "सगळे छोले भटुरे एकट्यानेच संपवलेस का?" असं कॅप्शन टाकलं आहे. त्याचबरोबर काही फोटो आणि व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केले असून हे पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com