
Wittyfeed : जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी एका रात्रीत बुडाली! नव्याने उभा केला 300 कोटींचा स्टार्टअप
Wittyfeed : टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध शो शार्क टँकच्या माध्यमातून देशातील बरेच तरुण त्यांच्या वेगवेगळ्या स्टार्टअप आयडियाज मांडतात. शार्क टँक शोमधील बऱ्याच क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.सध्या सोशल मीडियावर चर्चेत असेलेल्या व्हिटीफिड या कंपनीच्या सक्सेस स्टोरीची चर्चा सगळीकडे दिसून येते.
'WittyFeed' जगातील एकेकाळी दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी कंपनी होती. 2014 मधे सुरू झालेली ही कंपनी अचानक 2018 च्या सकाळी गायब झाली. कंपनीच्या CEO साठी ही फार धक्कादायक बाब होती. या कंपनीचा रिवेन्यू ४० करोडचा होता.
फेसबुकमुळे एका रात्रीत बुडाली कंपनी
'WittyFeed' ही कंपनी व्हायरल काँटेंट क्रिएट करायची. त्यांच्या वेबसाईटचं सगळं ट्राफिक हे फेसबुकवरून यायचं. कंपनीचं १२० मिलीयन महिन्याचं ट्राफिक म्हणजेच या साइटला महिन्याचे १२ करोड व्ह्यूवर्स व्हिजीट करायचे. मात्र 2018 च्या शेवटी असे काही झाले की ही कंपनी एका रात्रीत गायब झाली.
नेमकं काय झालं होतं?
'WittyFeed' कंपनीला फेसबुकने डिप्लॅटफॉर्म केलं. त्यामागचं कारण म्हणजे यूएसमध्ये कँब्रिज अॅनॅलिटीचा खूप मोठा घोळ झाला होता. त्यामुळे फेसबुकने अशा सर्व कंपन्यांना डिप्लॅटफॉर्म केलं ज्यामधे एक होती 'WittyFeed'. अनेक नॉन अमेरिकन कंपन्या फेसबुकला प्लॅटफॉर्म म्हणून वापरत अमेरिकन वोटर्सवर प्रभाव पाडत होत्या. 'WittyFeed'कंपनीचे 50 टक्के व्ह्यूवर्स हे यूएसचे होते. म्हणजेच या कंपनीचे 12 कोटींपैकी 6 कोटी वोटर्स हे यूएसचे होते. त्यामुळे अधिकृतरित्या न कळवता फेसबुकने या कंपनीला डिप्लॅटफॉर्म केलं.

फेब्रुवारी 2019 पर्यंत या कंपनीचे सगळे पैसे संपलेत आणि ही कंपनी ठप्प पडण्याच्या मार्गावर होती. मात्र आपलं यश इथेच थांबता कामा नये, पुन्हा पुनर्विचार करून काहीतरी मार्ग काढता येईल असा विश्वास कंपनीचे संस्थापक विनय सिंघल यांना होता.
त्या वर्षाच्या शेवटी, विनय, शशांक आणि प्रवीण यांनी मिळून भारतासाठी नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म तयार करण्याचे ठरवले. जो एक OTT प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आला. आज, या हायपरलोकल व्हिडिओ एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मने वीस लाखांहून अधिक डाउनलोड नोंदवले आहेत आणि एक लाखाहून अधिक पैसे भरणारे ग्राहकसुद्धा.
या कंपनीला आता विजय शेखर शर्मा, रितेश मलिक, ब्लूम व्हेंचर्स, व्हेंचर कॅटॅलिस्ट्स आणि इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्स यांच्यासारख्यांचा पाठिंबा आहे.
फेसबुकने काही न कळवता एका रात्रीत कंपनी नेस्तनाबूत केली
WittyFeed ही अधिकृत साइट हटवण्यापूर्वी, संस्थापकांचे वैयक्तिक फेसबुक प्रोफाइल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविले गेले. कंपनीत काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांनी क्रिएट केलेला काँटेंटसुद्धा प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. कंपनीचे संस्थापक सिंघल म्हणाले, “आम्ही काही धोरणांचे उल्लंघन केले असेल पण आम्हाला त्याबद्दल कधीच कळवले गेले नाही…,'फेसबुकला माणसांशी बोलता येत नाही..असे म्हणत एका मुलाखतीत सिंघल यांनी त्यांची व्यथा मांडली.
WittyFeed कंपनी कायम फायद्यात होती.पण बंद पडल्यानंतर लगेचच संघाकडे पैसे संपले. संस्थापक संघाने 90 कर्मचारी शिल्लक असलेल्या टाऊन हॉलची मागणी केली आणि दोन पर्याय मांडले. ते म्हणजे कंपनी एकतर त्याच दिवशी बंद करू शकतात किंवा संघ संस्थापकावर विश्वास ठेवू शकता आणि आणखी सहा महिने त्यांच्यासोबत राहू शकता.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 54 लोकांनी त्यांच्या पगारातील केवळ 25 टक्के रक्कम घेऊन तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. उर्वरित 75 टक्क्यांपैकी दुप्पट भाग इक्विटी म्हणून देण्यात आला.
विनय म्हणतात, "हे 54 कर्मचारी आमचे देवदूत गुंतवणूकदारासारखे ठरले, परतून नव्या वाटचालीत ते मदतनीस ठरले. आज भारतातील हा प्रमुख OTT प्लॅटफॉर्म जागतिक पातळीवर स्थानिक लोकल भाषेत काँटेंट क्रिएट करत आहे. म्हणजेच ते गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मराठी यांसारख्या भाषांमध्ये व्हिडिओ काँटेंट तयार करतात.
नवी कल्पना सुचली
हरियाणवीमध्ये बोलणे वाढल्यामुळे कंपनीच्या संस्थापकाला आणि त्याच्या सह-संस्थापकांना बोलीभाषेत कोणताही काँटेंट का उपलब्ध नाही याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. “भारतासाठी तयार केलेली खरी हायपरलोकल कंपनी बोली-आधारित व्यासपीठ असेल. आणि याच कल्पनेने लाखो लोकांना या प्लॅटफॉर्मशी जोडले.
सगळ्यात आधी कंपनीच्या टीमला हे सिद्ध करायचे होते की प्रत्यक्षात स्थानिक बोली भाषेमधील काँटेंट वापरण्यास इच्छुक प्रेक्षक आहेत. मात्र कंपनीच्या स्थापनेनंतरचे पहिले 18 महिने ही इनवेस्टमेंटची समस्या सोडवण्यात गेले. लोक स्थानिक भाषांमधील सामग्री वापरण्यास इच्छुक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर, स्टार्टअपला पुरवठ्याची समस्या सोडवावी लागली. हे सोडवण्यासाठी, कंपनीने ने सुरवातीपासून एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले, हरियाणवीमध्ये पहिली वेब सिरीज बनवली.
त्याची कमाईसुद्धा चांगली होती .“ग्रामीण भारतात आपण जितके श्रेय देतो त्यापेक्षा जास्त पैसा आहे. त्यासाठी कंपनीला फक्त पैसा उभा करायचा होता असे विनय म्हणतात. गेल्या एप्रिलमध्ये हा फ्री प्लॅटफॉर्मवरून पूर्ण-पेड प्लॅटफॉर्मवर गेला आणि तेव्हापासून, त्याने एक लाखाहून अधिक पैसे भरणारे ग्राहक जोडले आहेत.
कंपनीच्या वाट्याला तब्बल 500 रिजेक्शन्स
500 नकारांवर मात करून विटीफीडच्या संस्थापकांनी त्यांच्यासाठीची बाजारपेठेत विश्वासार्हता मिळवली असली असली तरी,“ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी, तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. फक्त एक चांगली वेब सिरीज तयार करण्यासाठी तुम्हाला करोडो रुपये खर्च करावे लागतील,” हे कंपनीच्या लक्षात आले. त्यासाठी कंपनीला अधिक बाह्य निधी उभारणे आवश्यक होते आणि ते सोपे नव्हते.
कंपनी काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्नात होती. त्यामुळे, गुंतवणुकदारांना मॉडेल समजून घेणे खूप कठीण गेले. त्यांचा प्रोजेक्ट समजून घ्यायला गुंतवणुकदारांना त्यांचा प्रोजेक्ट भरपूर वेळ द्यावा लागायचा.
व्हीसी बोर्डात येण्यापूर्वी गुंतवणुकीसाठी कंपनीचे ब्लुमशी दीड वर्षापेक्षा जास्त काळ संवाद सुरू होता. मात्र तरीदेखील त्यांना नकार मिळाला. आज मात्र एका रात्रीत बुडालेल्या विटीफिड कंपनीने स्टार्टाअपसाठी 30.75 कोटी रुपये निधी उभारला आहे. कंपनी एका रात्रीत बुडाल्याप्रमाणे हा निधी एका रात्रीत उभा झाला नव्हता. त्यासाठी या तिन्ही पाटनर्सने भरपूर कष्ट आणि मेहनत घेतली. सर्वप्रथम हे करण्यासाठी माणसात संयम असावा लागतो असे विनय म्हणाले.