Budget Session 2023 : एकही गरीब नसलेला देश बनवणं हे ध्येय - राष्ट्रपती

देशातील सध्याचं मोदी सरकार हे स्वप्ने पूर्ण करणारे सरकार असल्याचे मूर्मू म्हणाल्या.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSakal

Budget Session 2023 : आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. (President Droupadi Murmu Addresses Parliament)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या अभिभाषणात मूर्मू म्हणाल्या की, 2047 पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल आणि ज्यामध्ये आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील.

President Droupadi Murmu
D.Ed B.Ed उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; पाच वर्षांपासून रखडलेल्या TIT परीक्षांची घोषणा

आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो 'आत्मनिर्भर' असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल. याशिवाय एकही गरीब नसलेला देश बनवणं हे ध्येय असल्याचेही त्या म्हणाल्या.

मूर्मू म्हणाल्या की, आपल्याला नवीन युग निर्माण करायचे आहे. असा भारत घडवायचा आहे, ज्यात गरीबी नाही, मध्यमवर्गही संपत्तीने भरलेला असा भारत आपल्याला घडवायचा आहे,

स्वप्न पूर्ण करणारे सरकार

देशातील सध्याचे सरकार हे राष्ट्र उभारणीचे कर्तव्य पार पाडण्यात गुंतले असून, हे सरकार स्वप्ने पूर्ण करणारे सरकार असल्याचे मूर्मू म्हणाल्या. तसेच भारतात प्रगतीसोबतच निसर्गाची काळजीदेखील या सरकारकडून घेतली जात आहे. 

आज देशात स्थिर, निर्भय आणि निर्णायक सरकार अस्तित्त्वात असून, मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी काम करत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यापासून ते तिहेरी तलाक रद्द करण्यापर्यंत, सध्याच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. 'गरीबी हटाओ' ही केवळ घोषणा राहिलेली नसून मोदी सरकार गरिबांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी काम करत आहे.

सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे आता मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने या समाजातील लोक नवी स्वप्ने पाहू शकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com