D.Ed B.Ed उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; पाच वर्षांपासून रखडलेल्या TIT परीक्षांची घोषणा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
BEd  Course
BEd Courseesakal

TIT Exam Date Announced : D.Ed B.Ed उमेदवारांसाठी एक आनंदाची बामती समोर आली आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

BEd  Course
Priyanka Chopra Daughter : 'देसी गर्ल' प्रियांकाच्या पोरीची पहिली झलक! नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

BEd  Course
Vistara Air : कपडे काढले, एअर होस्टेसला मारहाण; मुंबईला येणाऱ्या 'विस्तारा'त महिलेचा गोंधळ

२२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आजपासून ते ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

त्यानंतर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीसाठी आवश्यक असणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

BEd  Course
Maharashtra MLC Election: शिक्षक-पदवीधरसाठी मतदान संपलं; सरासरी ७२.४४ टक्के झालं मतदान

गेल्या पाच वर्षांपासून लाखो डी.एड बी.एड उमेदवार आणि ५४ हजार पात्र शिक्षक या परिक्षेची वाट बघत होते. त्यानंतर आता या सर्वांची प्रतीक्षा संपली असून, येत्या २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान विविध सेंटर्सवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

BEd  Course
Teacher Recruitment : शिक्षक भरती ठरणार ‘नाकापेक्षा मोती जड’

२०१७ मध्ये पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून विविध व्यावस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जाते.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध शाळांमध्ये अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, आता TIT परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर भरती केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com