
नवी दिल्ली : सलग आठवा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पी भाषण कृषी, मध्यमवर्गीय व बिहारकेंद्रित घोषणांमुळे लक्षवेधी ठरला. मात्र कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून आक्रमक विरोधकांनी केलेली घोषणाबाजी आणि अल्पकाळासीठाचा सभात्याग यामुळे अर्थसंकल्पी भाषणाला गोंधळाचे गालबोट लागले.