
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. करदात्यांना सर्वात मोठा दिलासा देत अर्थमंत्री सीतारामन यांनी १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केलं. याशिवाय इतरही अनेक मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्यात. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, बंदुकीच्या गोळीनं झालेल्या जखमेवर मलमपट्टी केल्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, जागतिक अनिश्चततेत आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एका चांगल्या बदलाची आवश्यकता होती. पण हे सरकार विचारांनी दिवाळखोर आहे.