फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याची तयारी करत आहात काय ? अर्थमंत्र्यांनी दिली ही भेट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

केंद्र सरकार 'परवडणारे घर' आणि 'सर्वांसाठी घर' या योजनेला खूप महत्त्व देत आहे. सरकारने अर्थसंकल्प 2021 मध्ये या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. याच क्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान परवडणारी घरावर देण्यात आलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांची सूट एक वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकार 'परवडणारे घर' आणि 'सर्वांसाठी घर' या योजनेला खूप महत्त्व देत आहे. सरकारने अर्थसंकल्प 2021 मध्ये या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. याच क्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान परवडणारी घरावर देण्यात आलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांची सूट एक वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांच्या योजनेवरही 31 मार्च 2022 पर्यंत लाभ घेता येईल. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घर खरेदी करणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल.  

Budget 2021: 'जल जीवन मिशन'वर मोदी सरकार ओतणार पाण्यासारखा पैसा

अर्थमंत्री म्हणाल्या की, मागील अर्थसंकल्पात मी परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत व्याजात अतिरिक्त कपातीची तरतूद केली. मी या कपातीची मर्यादा आणखी एक वर्ष अर्थात 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवते. अशाच पद्धतीने परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त कपात 31 मार्चपर्यंत घेण्यात आलेल्या कर्जासाठी उपलब्ध असेल. 

Budget 2021 : दारू पिणाऱ्यांची 'बैठक' महागणार

त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा लाभ आणखी एक वर्ष अर्थात 31 मार्च 2022 पर्यंत घेता येईल. यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला फायदा होण्याची आशा आहे. रिअल इस्टेट सेक्टर नोटबंदी आणि त्यानंतर जीएसटीनंतर संकटातून जात आहे. सरकारकडून या क्षेत्राला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींमुळे गती येण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 fm nirmala sitharaman on affordable housing loans real estate