Budget 2021 : दारू पिणाऱ्यांची 'बैठक' महागणार

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातून काहींना दिलासा तर काहींच्या पदरी निराशा पडली आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातून काहींना दिलासा तर काहींच्या पदरी निराशा पडली आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांमुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महागणार आहेत. यात मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दारु किंवा त्यासारख्या पेयांच्या किंमतीत मोठी वाढ केली जाणार आहे अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अल्कोहल असलेल्या पेयांवर सेसचा दर तब्बल 100 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. यामुळे दारुसह बिअरच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - Budget 2021: थोडक्यात बजेटचा संपूर्ण आढावा, वाचा महत्त्वाचे मुद्दे

पेट्रोल डिझेलवर कृषी अधिभार
अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर 75 वर्षांवरील व्यक्तीच्या लोकांना रिटर्न भरावा लागणार नाही. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू केला आहे. यामध्ये पेट्रोलवर अडीच तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लागू केला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही असं सांगितलं जात आहे.

Budget 2021 बद्दलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Budget 2021 : काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाइल उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं मोबाइल उपकरणांवरची कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तर कॉपर आणि स्टीलवरची कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर सोने आणि चांदीवरची कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळे कॉपर, स्टीलच्या वस्तू स्वस्त होतील. तसंच सोने-चांदीचे दरही कमी होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 updates liquor beer rates will increase