Budget 2021 - पेट्रोलवर अडीच तर डिझेलवर चार रुपयांचा कृषी अधि'भार'

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

 केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांच्या पदरात काहीच न पडल्यानं त्यांची निराशा झाली आहे. त्यातच सर्वसामान्यांना आता मोठा दणका बसणार आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांच्या पदरात काहीच न पडल्यानं त्यांची निराशा झाली आहे. त्यातच सर्वसामान्यांना आता मोठा दणका बसणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडणार आहे. इंधनावर कृषी अधिभार लावण्यात येणार असून त्यामुळे दरात मोठी वाढ होणार आहे. 

पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर चार रुपयांचा शेती उपकर लावला आहे. यामुळे पेट्रोलचा दर पेट्रोलचे 96 रुपयांपर्यंत आणि डिझेल 86 रुपयांपर्यंत जाईल असं म्हटलं जात आहे. मात्र याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा - Budget 2021: रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा

हे वाचा - Union Budget 2021 : LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार

इंधनावरील अबकारी करात वाढ होत असल्याने त्यात दिलासा मिळळेल अशी  अपेक्षा व्यक्त केली जात होती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर हे साठ रुपये प्रति बॅरल आहेत. तरीही भारतात इंधनाचे जास्त आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात या करवाढीची घोषणा करण्यात आली नाही. अर्थसंकल्पाच्या इतर कागदपत्रांत याचा उल्लेख आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 imposes farm cess on petrol diesel