Budget 2021: थोडक्यात बजेटचा संपूर्ण आढावा, वाचा महत्त्वाचे मुद्दे

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 1 February 2021

कोरोना महामारीच्या संकटात रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आज बजेट सादर करण्यात आला.

नवी दिल्ली Union Budget 2021- कोरोना महामारीच्या संकटात रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आज बजेट सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यातील महत्त्वाच्या सेक्टरबाबत केलेल्या महत्त्वाच्या घोषणा थोडक्यात पाहूया...
 
शिक्षण -
- खाजगी क्षेत्राच्या मदतीने 100 नव्या सैनिकी शाळा उभारणा
-लडाखच्या लेहमध्ये सेट्रेंल युनिव्हर्सिटी
-आदिवासी भागात 758 एकलव्य स्कूल; एका शाळेवर 38 कोटी रुपये खर्च

वाहतूक
-सार्वजनिक बसेससाठी 18 हजार कोटींची तरतूद
-रस्त्यांसाठी 1.18 लाख कोटी रुपयांची तरतूद

Budget 2021 : काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रात मेट्रो
-नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची घोषणा
-नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची घोषणा

कृषीक्षेत्रासाठी
-गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद
-शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं उद्दीष्ट 
-धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी 1.72 लाख कोटी
-लहान सिंचन प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद

रेल्वे होणार हायटेक
-2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर
-रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींची विक्रमी तरतूद

आरोग्य
-आरोग्य बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांची वाढ
-आरोग्य क्षेत्रासाठी 23 हजार कोटी
-कोविड व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद 
-कोरोना लस मोफत करण्याची घोषणा नाहीच
-वायू प्रदूषणाचे आव्हान मोडून काढण्यासाठी 2 हजार 217 कोटी रुपये
-शहरी स्वच्छ भारत अभियानासाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद

Budget 2021 : मोदी सरकारच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण; सीतारमण यांच्या कार्यकाळात...

टॅक्स   
-75 वर्षावरील नागरीकांना पेन्शंनमधून मिळणाऱ्या उत्पनावर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
-काँर्पोरेट कर, डिव्हीडंडमधून मिळणाऱ्या उत्पादनावरच्या करात कपात
-टँक्स आँडीटची मर्यादा 5 कोटींवरुन 10 कोटींवर
-जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी 6 वर्षाऐवजी 3 वर्षाच रेकाँर्ड तपासणार
-मोबाईल ची कस्टम ड्युटी वाढवून 2.5 टक्यांवर; काही पार्ट्सवर टॅक्स

इतर

-पुढीत 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्क
-पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद
-असंघटीत क्षेत्रासाठी केंद्राकडून नव्या पोर्टलची घोषणा
-अनेक सरकारी कंपन्यांचं निर्गुंतवणुकीकरण
- समुद्र संशोधनासाठी 4 हजार कोटींची घोषणा

-भारतात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना, त्यासाठी 3 हजार कोटींहून अधिक रकमेची -घोषणा उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटीने वाढवणार 
-कोरोनामुळे सरकारसमोर आर्थिक संकट; सरकारला 80 हजार कोटींच्या निधीची गरज; त्यासाठी अनेक योजनांची तरतूद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 updates finance minister nirmala sitharam marathi news