
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गिग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बऱ्याच काळापासून गिग कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा धोरण आणण्याची मागणी केली होती. आता या कर्मचाऱ्यांना ओळख देण्यासाठी सरकारकडून नव्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. गिग वर्कर्स बराच काळ एखाद्या संस्थेत काम करतात. मात्र त्यांना कामाच्या बदल्यात केवळ पैसे मिळतात. इतर कोणतीही सामजिक सुरक्षा किंवा सुविधा मिळत नाहीत. आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध नसतात.