
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आली. यात बिहारवर अनेक घोषणांची खैरात केली आहे. बिहारच्या निवडणुका या वर्षी होणार असून इथं भाजप आणि जेडीयूची आघाडी असणार आहे. जेडीयूला सोबत ठेवण्यासाठी आणि बिहारच्या जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी मोदी सरकारने घोषणा केल्याचं म्हटलं जात आहे. निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या साडीपासून ते अर्थसंकल्पात घोषणांमध्येही बिहारला प्राधान्य दिलंय. निर्मला सीतारामन यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मिथिला पेंटिंगची साडी परिधान करून त्या पोहोचल्या होत्या. तसंच त्यांनी मखाना बोर्डसह अनेक योजनांची घोषणा केली ज्या बिहारमध्येच सुरू होतील. बिहारच्या आर्थिक विकासात वाढ होईल आणि सामाजिक विकाससुद्धा होईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.