'जागतिक बुद्धिबळ ओलिंपियाड' स्पर्धेत भारताची ऐतिहासिक विजयाकडे कूच 

India march to a historic victory in the World Chess Olympiad nashik marathi news
India march to a historic victory in the World Chess Olympiad nashik marathi news

नाशिक : अत्यंत अतीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अत्यंत जोमाने खेळ करून सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी अनमोल कामगिरी बजावली. यात नागपूरची दिव्य देशमुख व तमिळनाडूच्या प्रज्ञानंद या दोघांनी महत्वपूर्ण विजय मिळविले. तर पहिल्या चार खेळाडूंनी चीनी खेळाडूंची आघाडीची फळी रोखून धरण्याची नेत्रदीपक कामगिरी बजावली. मूळचा नाशिकचा असलेला व भारतीय संघाचा कर्णधार असलेला विदितने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या डिंग लिरेन याच्या विरूद्धचा सामना चांगला खेळ करून बरोबरीत सोडविला. 

माजी ऑलिंपिक विजेत्या चीनला भारतीय संघाने धूळ चारल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार्‍या पुढील फेर्‍यामध्ये रशिया, अमेरिका या संघाशी लढण्यासाठी आपला संघ सज्ज झाला आहे. २४ जुलै पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत जगातील १६३ देशाचे संघ सहभागी झाले होते. आता प्ले औफ चे महत्वाचे सामने बाकी असून भारतीय संघ जागतिक विजेतेपदपासून फक्त काही पावले दूर आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघात सहा खेळाडूंचा समावेश असून त्यात ३ महिला व २ जूनियर खेळाडू आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील काही सर्वश्रेष्ठ जूनियर खेळाडू भारतीय संघात आहेत जे चांगला खेळ करत आहेत. 

स्पर्धा पहिल्यांदाच ऑनलाइन

या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यास भारतीय संघाचे हे पहिलेच ऑलिंपिक विजेतेपद असणार आहे. जागतिक ऑलिंपिक बुद्धिबळ स्पर्धा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने या विजेतेपदाचे विशेष महत्व असणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला आपला डाव पूर्ण करण्यासाठी १५ मिनिटे व प्रत्येक चालींनंतर १० सेकंड इंक्रेमेंट असा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंना अतिशय सजगपणे आपल्या चाली कराव्या लागतात. भारतीय संघात विश्वनाथ आनंद सह विदित गुजराथी (कर्णधार), प्रज्ञानंद, कोणेरू हम्पी, द्रोणवली हरिका, निहाल सरीन, पेन्तला हरिकृष्ण, वंतिका अग्रवाल यांचा समावेश आहे. 

जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) तर्फे आयोजित जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ओलांपियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ संघाने बलाढ्य चीनचा निर्णायक पराभव करून क्वार्टर फाईनलमध्ये प्रवेश केला. आतापर्यंतच्‍या कामगिरीतून भारतीय संघाने आत्‍मविश्र्वासाचे दर्शन घडविले असून, ऐतिहासिक विजयाकडे कूच केली आहे. 
- विनोद भागवत, कॅन्डीडेट मास्टर व फिडे प्रमाणित प्रशिक्षक. 


संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com