
पंधरा वर्षांच्या चांगल्या सेवेबद्दल देण्यात येणारे महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहे. त्यात, शहर पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे
नाशिक : पंधरा वर्षांच्या चांगल्या सेवेबद्दल देण्यात येणारे महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहे. त्यात, शहर पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी (ता. २६) ध्वजवंदनानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शहरातील ११ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
यात, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर खंडेराव घाडगे, उपनिरीक्षक भीमराव शंकरराव गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल रामा भालेराव (सर्व गुन्हे शाखा), भागीरथ पोपटराव हांडोरे (देवळाली कॅम्प), सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र दगडू ठाकरे (पोलिस मुख्यालय), विष्णू भास्कर उगले (आर्थिक गुन्हे शाखा), सुरेश विष्णू माळोदे (म्हसरूळ), प्रभाकर रामकृष्ण कोल्हे (सरकारवाडा), देवराम कचरू सुरुंगे (शहर वाहतूक शाखा), भारत दौलत पाटील (म्हसरूळ) यांचा समावेश आहे.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच