अंधारात पडताहेत टमरेलबहाद्दर बाहेर!

अंधारात पडताहेत टमरेलबहाद्दर बाहेर.jpg
अंधारात पडताहेत टमरेलबहाद्दर बाहेर.jpg

नाशिक : (कळवण) स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा झाली. तरी जिल्ह्यातील 11 हजार 752 जणांकडे स्वच्छतागृहच नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी अंधारातच टमरेलबहाद्दर घराबाहेर पडत असल्याने संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी प्रशासन सरसावले आहे. 

जिल्ह्यात तब्बल 11 हजार 772 कुटुंबांकडे स्वच्छतागृह नसल्याचे समोर 

वर्ष 2014 मध्ये सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील पहिला नाशिक जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मार्च 2017 मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केली होती. त्यानंतर दुष्काळाचा फटका बसला. पाणीप्रश्‍न निर्माण झाला. त्याचा परिणामही स्वच्छतागृहांचा वापर बंद झाला. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचे बांधकाम रखडले. अनेकांचे बांधकामही थांबले. परिणामी, जिल्ह्यात तब्बल 11 हजार 772 कुटुंबांकडे स्वच्छतागृह नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात तीन लाख 80 हजारांहून अधिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. 

कुटुंबांना फेब्रुवारी 2020 अखेर स्वच्छतागृह उपलब्ध

पाणंदमुक्तीच्या घोषणेनंतर पुन्हा ग्रामविकास विभागाने स्वच्छतागृह नसलेल्या गावांतील कुटुंबांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा कुटुंबांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची सूचना प्रधान सचिवांनी जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार 357 ग्रामपंचायतींच्या सरपंचांना स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांना ते बांधण्यासाठी पुढाकार घेण्याचे पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच, ग्रामसेवकांच्या मदतीने पंचायत समिती कार्यालयात स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाने केलेल्या बेसलाइन सर्वेक्षणातील समाविष्ट नसलेल्या कुटुंबांना फेब्रुवारी 2020 अखेर स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. 

वर्षअखेरपर्यंत उद्दिष्ट...तालुका कुटुंबांची संख्या 

दिंडोरी 435, चांदवड 44, इगतपुरी 222, कळवण 2,737, सिन्नर 333, पेठ 251, सुरगाणा 2,229, नाशिक 503, बागलाण 682, देवळा 162, नांदगाव 528, निफाड 868, मालेगाव 391, येवला 2,164, त्र्यंबकेश्‍वर 203 

ग्रामपंचायतींतर्गत अजूनही शौचालय नसलेली कुटुंबे 

काही ग्रामपंचायतींतर्गत अजूनही शौचालय नसलेली कुटुंबे आहेत. पायाभूत सर्वेक्षण 2012 मधील व शौचालय नसलेल्या कुटुंबांची नावे ग्रामपंचायत स्तरावरून घेतली असून, लवकरच त्यांना शौचालय बांधल्यानंतर शौचालय प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. -डी. एम. बहिरम, गटविकास अधिकारी, कळवण 
 
शौचालय नसलेल्या कुटुंबांची नावे पंचायत समितीत सादर 

काही कुटुंबे 2012 मध्ये झालेल्या सर्वेक्षणातून सुटली आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबांची नावे पंचायत समितीत सादर केली आहेत. -संजय चौधरी, ग्रामसेवक, गोपाळखडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com