पिंपळगाव बसवंत शहराने करुन दाखवलं! कोरोनाचे उरले फक्त 19 रूग्ण

corona patients
corona patients

नाशिक/पिंपळगावं बसवंत : आशिया खंडातील शेतीमालाची अव्वल बाजार समिती, शेतीसह विविध वस्तुची बाजारपेठ, महामार्ग यामुळे बाहेररून येणाऱ्या व्यक्तीची वर्दळ वाढल्याने पिंपळगावं बसवंत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. गेली चार महिन्यापासुन दरोरोज 15 ते 20 रूग्णांची भर पडत होती.पण आरोग्य यंत्रणेचे परिश्रम व नागरिकांनी घेतलेली खबरदारी यामुळे पिंपळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या नगण्य झाली आहे. आता केवळ 19 रूग्ण उपाचाराखाली असल्याने पिंपळगावकरांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे.

15 ते वीस नवीन रूग्ण आढळत होते

कोरोनाच्या पाश्‍वभुमीवर देशात 23 मार्च पासुन लॉकडाऊन जाहीर झाला. त्या नंतर दोन महिने कोरोनाला पिंपळगावंकरानी वेशीवरच रोखले होते. पण जुनच्या पहिल्या आठवड्यात रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव एवढा वाढला की नागरिक तर भयभीत झाले शिवाय ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्या नाकीनऊ आले. दररोज 15 ते वीस नवीन रूग्ण आढळत होते. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले पिंपळगांव शहर अधिक धोकादायक वळणावर गेले. मुस्लीम मोहल्ला, चिंचखेड रोड, माळी गल्ली हे दाटीवाटीचे परिसरात तर रूग्ण संख्या झपाटयाने वाढत होते.पण त्यानंतर घेतलेली खबरदारी, केलेल्या उपाययोजना यामुळे शहरातील एकुणच रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटत गेली.

फक्त 19 रूग्ण उरले

आरोग्य कर्मचारी, आशा यांनी माझे कुटुंब,माझी जबाबदारीची मोहीम प्रभावीपणे राबविली.ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात इतरांना मज्जाव व नागरिकांना ध्वनीक्षेपकाव्दारे आवाहन याला नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टसिंग व सॅनिटायझरचा वापर यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे.कोरोनावर बहुतांश प्रमाणात मात केली आहे.आता तर फक्त 19 रूग्ण उरले असुन त्यांचाही क्वारंटाईन कालावधी संपत असल्याने पिंपळगावं शहर कोरोनामुक्त होण्याची दिशेने मार्गक्रमण करीत आहे.हे दिलासा देणारी स्थिती असली तरी नागरिकांनी बेफिकीरी करू नये. 

कोरोना मिटर...

एकुण पॉझीटिव्ह रूग्ण-526

कोरोनामुक्त झालेले-501

एकुण मृत्यु-6

सध्या उपचार घेणारे-19

प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या सुचना ची अमंलबजावणी करण्याची आहे.घराबाहेर पडतांना मास्कचा वापरण्याची शिस्त लावावी.नागरिकांच्या सहकार्यानेच कोरोनाला अटकाव करता आला आहे. -डॉ.योगेश धनवटे (वैद्यकीय अधिकारी,पिंपळगांव बसवंत).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com