रस्त्यांना मोकळा श्वास! कळवण तालुक्यात २८ किमी पांधी, शिवार रस्ते खुले

 panad.jpg
panad.jpg

नाशिक : (कळवण) शेतबांधासाठी भावाभावांची भांडणे होऊन बांध फोडणे, रास्ता अडवणे हे प्रकार गावागावांत नेहमीच होत असतात. मात्र कळवण तहसीलच्या महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील ६५ किलोमीटर अतिक्रमित रस्ते खुले झाले आहेत. याबाबत विशेष अभियान राबवून तालुक्यात एकूण २८ किलोमीटर पाणंद रस्त्यांच्या कामाला लोकसहभागातून ठिकठिकाणी चालना मिळाल्याने शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनाया रस्त्यांचा फायदा होत आहे. 

शेतकऱ्यांमध्ये समाधान 

ग्रामीण भागातील एका गावाहून दुसऱ्या गावास जाणारे रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, बैलगाडी मार्ग, पांधी, शिवार रस्ते आदी शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांत आपसांत मोठे वाद होतात. अनेकांची रस्त्यासाठी तहसील, उपविभागीय कार्यालये, न्यायालयात प्रकरणे सुरू होती. तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी यांनी गावागावांत दळणवळणासाठी रस्त्याचे महत्त्व पटवून दिल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने तालुक्यातील २८ किलोमीटरचे अतिक्रमित रस्ते मोकळे झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

कळवण तालुक्यात २८ किमी पांधी, शिवार रस्ते खुले 

तालुक्यातील कातळगाव ते शिवपांधी, ओतूर गावठाण ते देवरे वस्ती, मार्कंड पिंपरी ते गवळी शेतरस्ता, कुंडाणे येथील हत्ती वस्ती ते पांधी रस्ता, देवळी वणी ते बोरदैवत, सुकापूर ते वडपाडा, रवळजी ते खेडगाव पांधी रस्ता, देसराने ते रवळजी शिवरस्ता, कोसवण ते जामुनपाडा, पाळे खुर्द ते पाळे बुद्रुक शिव पांधी रस्ता आदी अतिक्रमित रस्ते खुले होऊन लोकसहभागातून तेथे माती, मुरूम टाकण्यात आला आहे. 

महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाने पुढाकार घेऊन चांगले रस्ते निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. - बंडू कापसे, तहसीलदार, कळवण 

रस्त्याची सुधारणा होण्याच्या दृष्टीने रस्त्यांचा विकास आराखड्यात समावेश करून रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळविण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर आहे. - नितीन पवार, आमदार 

पावसाळ्यात जर कोणाची तब्येत बिघडली, तर संबंधित रुग्णाला झोळी करून रस्त्यावर आणावे लागत होते. रस्ता खुला झाल्याने गैरसोय टळली आहे. - पोपट गवळी, ग्रामस्थ, कातळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com