
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ३९ समित्यांच्या प्रमुखांसह उपप्रमुखांची निश्चिती झाली आहे. समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी याविषयीची घोषणा मंगळवारी केली.
नाशिक : येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ३९ समित्यांच्या प्रमुखांसह उपप्रमुखांची निश्चिती झाली आहे. समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी याविषयीची घोषणा मंगळवारी (ता. ९) केली. त्यात मात्र निधी संकलन समितीसाठी एकच उपप्रमुख निश्चित झालेत. तसेच व्यासपीठ- बैठक, सोशल मीडिया, छपाईसाठी तीन उपप्रमुख आहेत.
व्यासपीठ- बैठक अन् सोशल मीडिया, छपाईसाठी तीन उपप्रमुख
समित्यांच्या प्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे असून, (कंसात उपप्रमुखांची नावे दर्शवतात) : सल्लागार मंडळ (मार्गदर्शन समिती) समन्वय- डॉ. स्वप्नील तोरणे (प्रा. डॉ. सुरेश पाटील- भिलोटकर, शंतनू देशपांडे), पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य समन्वय- प्रदीप पेशकार (अजय पंचाक्षरी, स्वरूपा मालपुरे), संयोजन व नियोजन- प्रशांत कुलकर्णी (मिलिंद कुलकर्णी, अश्विनी देशपांडे), स्वागत समिती (नियोजन)- विजयलक्ष्मी मणेरीकर (प्रमोद पुराणिक, तोरल टकले), सत्कार- अनघा धोडपकर (ज्योती वाघचौरे, राजश्री शिंपी), अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अतिथी- डॉ. सुधीर संकलेचा (मंगेश पंचाक्षरी, डॉ. रविराज खैरनार), मदत कक्ष- महेश दाबक (विशाल उगले, पल्लवी बोराडे), निधी संकलन- रामेश्वर कलंत्री (रघुवीर अधिकारी), कार्यालयीन कामकाज व विविध सरकारी परवानगी- सुनील गायमुखे (संजय खैरनार, मनीषा पगारे), लेखा व परीक्षण- विनोद जाजू (उदयराज पटवर्धन, प्रवीण मालुंजकर), उद्घाटन व समारोप- गिरीश नातू (डॉ. मनोज शिंपी, देवदत्त जोशी), कार्यक्रम (काव्यवाचन व स्वागत)- संजय चौधरी (प्रतिभा सोनवणे, जयश्री कुलकर्णी),
हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी
कार्यक्रम (परिसंवाद)- दत्ता पाटील (अपर्णा क्षेमकल्याणी, सतीश मोहोळे), बालकुमार मेळावा- संतोष हुदलीकर (प्रा. सोमनाथ मुठाळ, योगिनी जोशी), बोलीभाषा- कवीकट्टा- संतोष वाटपाडे (सागर पाटील, डॉ. स्मिता मालपुरे), गझल कट्टा- संजय गोरडे (अरुण सोनवणे, आकाश कंकाळ), सांस्कृतिक कार्यक्रम- सचिन शिंदे (विनोद राठोड, आदित्य समेळ).
मंडप- व्यासपीठ- प्रवेशद्वार- दालन उभारणी- रंजन ठाकरे (दिनेश जातेगावकर, श्रीनिवास रानडे), सभामंडप- व्यासपीठ सजावट- बैठकव्यवस्था- मंजुश्री राठी (शीतल सोनवणे, राजेश सावंत, चित्रकार अनिल माळी), ध्वनियंत्रणा व प्रकाश योजना- सुरेश गायधनी (ईश्वर जगताप, आशिष रानडे), भोजन-अल्पोपहार- उमेश मुंदडा (सुनील चोपडा, विनय अंधारे), स्वच्छता- पाणीपुरवठा व वीजव्यवस्था- समीर रकटे (संतोष बेलगावकर, नंदकिशोर इरकूट), निवासव्यवस्था- विनोद जाजू (संतोष जाजू, ओमप्रकाश मालपाणी), ग्रंथप्रदर्शन व अन्य प्रदर्शने- वसंतराव खैरनार (पंकज क्षेमकल्याणी, हेमंत देशमुख),
हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट
साहित्य प्रकाशन- ग्रंथ प्रकाशन- प्रा. डॉ. राहुल पाटील (विश्वास देवकर, विजयकुमार मिठे), परिवहन- वाहतूकव्यवस्था- डॉ. श्रिया कुलकर्णी (अकोलकुमार जोशी, वसंत ठाकरे), वाहनतळ- गणेश बर्वे (विनायक काकुळते, सचिन रत्ने), स्वयंसेवक निवड- देखरेख- कार्यशाळा- प्राचार्य डॉ. संतोष मोरे (भूषण काळे, वेदांशू पाटील), सुरक्षाव्यवस्था- रवींद्र बेडेकर (किशोरी खैरनार, सुधाकर सोनवणे), प्रसिद्धी व माध्यम- जनसंपर्क- अभिजित चांदे (सुप्रिया देवघरे, नितीन मराठे), स्मरणिका संपादकीय व जाहिरात- स्वानंद बेदरकर (पीयूष नाशिककर, डॉ. चंद्रकांत संकलेचा), सोशल मीडिया- डिजिटल मार्केटिंग- वेबसाईट- हेमंत बेळे (पूजा बदर, शौनक गायधनी, मिशितेळ मांडगवणे), छायाचित्रण-ध्वनिमुद्रण- व्हिडिओ शूटिंग-नंदन दीक्षित (अनिल माळी, राजा पाटेकर), मुद्रण- मिलिंद कुलकर्णी (समीर देशपांडे, श्रीकांत नागरे, सुनीता परांजपे), शहर सुशोभीकरण- श्याम लोंढे (राखी तेज टकले, किरण जगताप), ग्रंथदिंडी- विनायक रानडे (गीता बागूल, एन. सी. देशपांडे), वैद्यकीय मदत- शशिकांत पारख (संध्या गुजर, डॉ. विशाल जाधव), विधी- शिस्तपालन- चौकशी व तक्रार निवारण- ॲड सुधीर कोतवाल (ॲड. अजय निकम, ॲड. चैतन्य शहा), आपत्कालीन नियोजन- संजय भडकमकर (मोनल नाईक, नीलेश तिवारी).
महामंडळाची ग्रंथ प्रदर्शन समिती
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे संमेलनासाठी ग्रंथ प्रदर्शन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या सुनीताराजे पवार, औरंगाबादचे कुंडलिक अतकरे, वर्धाचे प्रदीप दाते, नाशिकचे पंकज क्षेमकल्याणी, वसंत खैरनार यांचा समावेश आहे. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील हे अध्यक्ष, डॉ. दादा गोरे हे कार्यवाह, डॉ. रामचंद्र काळुंखे हे खजिनदार आहेत. ग्रंथ प्रदर्शन समितीचे कामकाज तातडीने सुरू करण्याच्या सूचना महामंडळातर्फे देण्यात आल्या आहेत.