ऐन दिवाळीत महावितरणची तिजोरी फुल्ल! पिंपळगावला दीड महिन्यात ४ कोटींची वसुली

दीपक आहिरे
Wednesday, 11 November 2020

पिंपळगांव बसवंत महावितरण विभागाअंतर्गत पालखेड, दावचवाडी, खेडगांव, वरखेडा आदी उपविभागा अतंर्गत 39 गावे आहेत. कृषी जोडणीसह एकुण 54 हजार वीज कनेक्शन आहेत. त्यात घरगुती, व्यापारी, वाणिज्य अशी 29 हजार वीज जोडणी ग्राहकांपैकी काहीनी वीज बिल थकविले.

नाशिक/पिंपळगाव बसवंत : सप्टेंबर अखेर थकीत सात कोटी रूपये वीज बील वसुलीचे आव्हान महावितरणच्या पिंपळगांव बसवंत विभागापुढे होते. वसुलीचे हे दिव्य पार पाडण्यासाठी पिंपळगांव विभागाने ग्राहकांना विजबील भरण्यासाठी विविध पध्दतीने आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

पिंपळगांव बसवंत महावितरण विभागाअंतर्गत पालखेड, दावचवाडी, खेडगांव, वरखेडा आदी उपविभागा अतंर्गत 39 गावे आहेत. कृषी जोडणीसह एकुण 54 हजार वीज कनेक्शन आहेत. त्यात घरगुती, व्यापारी, वाणिज्य अशी 29 हजार वीज जोडणी ग्राहकांपैकी काहीनी वीज बिल थकविले. थकबाकीचा आकडा वाढता वाढता सात कोटी रूपयांपर्यंत पोहचला. त्यानंतर खडबडुन जागे झालेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ॲक्शन मोड मध्ये आले.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

थकबाकीचा डोंगर काहीसा कमी

थकबाकीदारांच्या घरीजाऊन पाठपुरावा, सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जनजागृती असे उपक्रम हाती घेतले. त्याचा परिणाम ऑक्टोबर महिन्यात 2 कोटी 80 लाख रूपये तर नोव्हबरच्या दहा दिवसात एक कोटी 25 लाख अशी सुमारे चार कोटी पाच लाख रूपयांची वसुली झाली आहे. थकित रक्कमेपैकी पन्नास टक्के वसुली झाल्याने महावितरणची तिजोरी ऐन दिवाळीत लखलखत आहे. थकबाकीचा डोंगर काहीसा कमी झाला असला तरी पण अजुनही तीन कोटी रूपयांचे वसुली साठी कर्मचारी परिश्रम घेत आहे. गत दीड महिन्यात चार कोटी रूपये वीजबील वसुली झाली आहे. ग्राहकांनी दिवाळीच्या खरेदीत वीजबील भरण्यासालाही सहकार्य केल्याचे दिसते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात उजेड पेरणाऱ्या पिंपळगांव महावितरण विभागाची दिवाळी गोड होतांना दिसत आहे.

कर्मचाऱ्यांना दुहेरी काम

नागरिकांना विजेसारखी अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठी महावितरण अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र या कोरोना संकटातही आपल्या वीज ग्राहकांसाठी झटत आहे. पण आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला टिकविण्यासाठी वितरित केलेल्या वीजबिलांची वसुली होणेही तेवढेच गरजेचे असल्याने ज्या सुरळीत वीज पुरवठ्या बरोबरच बीलाची वसुली असे दुहेरी काम सध्या कर्मचाऱ्यांवर आहे.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशी आहोत - एकनाथ कापसे (कार्यकारी अभियंता, महावितरण, पिंपळगावं बसवंत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 crore electricity bill recovered from Pimpalgaon nashik marathi news