मध्यरात्रीचा खेळ! वाळूच्या अवैध उत्खनन विरोधात कारवाई; वाळू तस्करांची होतेय राजकीय पाठराखण?

vadangali sand.jpg
vadangali sand.jpg

नाशिक / सिन्नर : नदीपात्रातून विनापरवाना वाळूचे उत्खनन करून उपसा केल्याप्रकरणी वडांगळी (ता. सिन्नर) येथील वाळू तस्करांवर सोमवारी (ता. १०) मध्यरात्री नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला.

संबंधित पदाधिकारी सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात
जिल्ह्याचे अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रतिबंधक पथक आणि सिन्नर तहसील कार्यालय यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. वाळू तस्करीच्या या प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यासोबत ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारीही सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून झालेली कारवाई दडपण्यासाठी आपले राजकीय बळ वापरत संबंधित पदाधिकारी सकाळपासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडून असल्याची चर्चा होती. कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त करत संबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार याप्रमाणे २१० ब्राससाठी ६३ लाख ३० हजार रुपयांचा दंड करणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. 

वाळूचा साठा आणि विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर कारवाईत जप्त

रविवारी (ता. ९) रात्री अकराच्या सुमारास नाशिकचे विशेष पथक, सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे, स्थानिक तलाठी व्ही. डी. कवाळे, सोमठाणेचे तलाठी गणेश कदम, कोतवाल संजय धरम यांच्या पथकाने वडांगळीतील कासारी नाला परिसरात छापा टाकत वाळूचे अवैध उत्खनन आणि सुरू असलेला उपसा पकडला. तेथून वाळूचा साठा आणि विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर कारवाईत जप्त केले. या ठिकाणी नदीपात्रातून सुमारे २११ ब्रास वाळूचे उत्खनन केल्याचा पंचनामाही केला. बाजारमूल्याच्या पाचपट दंड तसेच रॉयल्टी मिळून प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे संबंधितांना दंड ठोठावण्यात येणार आहे. तलाठी कवाळे यांच्याकडून संबंधित ट्रॅक्टरमालकासह अन्य सहभागींवर मुसळगाव पोलिसांत वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. 

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

वाळू तस्करांची राजकीय पाठराखण 
वडांगळी येथे देवनदीसोबतच परिसरातील नाल्यांत उत्खनन करून खुलेआम विनापरवाना वाळूउपसा सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू तस्करांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने अधिकारी कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत, असे बोलले जाते. राजकीय पाठीराखे सोबत असल्याने वाळू तस्करांची हिंमत वाढली आहे. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com