esakal | बनावट कागदपत्रांपासून सावध! देणारा, स्वीकारणाऱ्यावर होणार कारवाई; आधारकार्ड केंद्रप्रमुखांना सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

Adhar card center

शासकीय कार्यालयातील कामांसाठी तसेच खासगी क्षेत्र आणि बॅंकांमध्ये आधारकार्डला विशेष महत्त्व आहे. कोरोना चाचणीसाठीदेखील आधारकार्ड आवश्‍यक आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक आधारकार्ड काढून घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत.

बनावट कागदपत्रांपासून सावध! देणारा, स्वीकारणाऱ्यावर होणार कारवाई; आधारकार्ड केंद्रप्रमुखांना सूचना 

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक :  आधारकार्ड काढण्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्यांसह घेणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. नुकतेच सरकारच्या आधारकार्ड विभागाकडून केंद्रप्रमुखांना सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांसह केंद्रातील कर्मचाऱ्यांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. 

शासकीय कार्यालयातील कामांसाठी तसेच खासगी क्षेत्र आणि बॅंकांमध्ये आधारकार्डला विशेष महत्त्व आहे. कोरोना चाचणीसाठीदेखील आधारकार्ड आवश्‍यक आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक आधारकार्ड काढून घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. कार्ड काढण्यासाठी अनेक जणांकडे आवश्‍यक कागदपत्रे नसल्याने इतर कुणाचे कागदपत्र घेऊन त्यावर खाडाखोड करतात. काहींकडून बनावट कागदपत्रे सादर केली जातात. असे प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून केंद्रांना प्राप्त झाल्या आहेत. असे प्रकार आढळल्यास बनावट कागदपत्र देणारे आणि ते स्वीकारणारे आधारकार्ड केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

‘जीपीओ’तील आधारकार्ड केंद्र सुरू 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि लॉकडाउनमुळे जीपीओ टपाल कार्यालयातील आधारकार्ड काढण्याचे सेवा केंद्र बंद करण्यात आले होते. सर्वत्र अनलॉक झाले असून, चार दिवसांपासून पुन्हा आधारकार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. दिवसभर केंद्राचे काम सुरू असते. आधारकार्डसंदर्भातील सर्वच प्रकारची कामे येथे केली जातात. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

संपादन - रोहित कणसे