स्वच्छ भारत अभियानात 'नाशिक' प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रशासन सज्ज! आयुक्तांचे नाशिककरांना आवाहन 

nashik city 1.jpg
nashik city 1.jpg

नाशिक : स्वच्छ भारत अभियानात नाशिकला देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांचा देखील सहभाग महत्वाचा ठरणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरचं इतरांनाही स्वच्छतेबाबत जागृत करण्यासाठी नाशिककरांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले. 

स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हा!
फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुक्त जाधव यांनी आवाहन केले. ते म्हणाले, स्वच्छ भारत अभियानात गेल्या काही वर्षांपासून वरचा नाशिकला हुलकावली देत होता. गेल्या वर्षी मात्र समाधानकारक कामगिरी झाली. देशात अकरावा तर राज्यात दुसया क्रमांकाचे स्थान मिळाले. परंतू या वर्षी देशात पहिल्या दहा शहरांमध्ये तर राज्यात पहिला क्रमांक नाशिकला मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिककरांनी देखील सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. नागरिक व संस्थांनी स्वच्छतेसाठी कल्पना सुचवून उपक्रम म्हणून अमलात आणावा, घराबरोबरचं कॉलनी, ईमारतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, ओला व सुक्या कचयाचे विलगिकरण करूनचं घंटागाडी मध्ये टाकावा, उघड्या जागेवर सुका कचरा न जाळता महापालिकेच्या गाडी मध्येचं टाकावा. गेल्या वर्षी कन्स्ट्रक्शन डेब्रीज मुळे कमी गुणांकन मिळाले. यंदा मात्र तसे होणार नाही. जोपर्यंत नवीन एजन्सी नियुक्त होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या घंटागाडी मार्फत डेब्रीज उचलले जाईल. त्यासाठी आठशे रुपये प्रतिटन दर निश्‍चित करण्यात आला आहे. डेब्रीज न उचलले गेल्यास दहा पट दंड देखील आकारला जाणार आहे. आपल्या परिसरातील डेब्रीज उचलण्यासाठी तसेच अस्वच्छता असल्यास विभागिय अधिकायांना कळविण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले. 

जनसहभाग महत्वाचा 
स्वच्छ भारत अभियानामध्ये इंदोर शहराने प्रथम पासूनचं आघाडी घेतली आहे. त्याला कारण म्हणजे तेथील नागरिक स्वताहून उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. हातगाडीवर विक्री करणारे विक्रेते देखील काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळतात. यातून त्यांची शहराबद्दलची आत्मियता दिसून येते. इंदोर प्रमाणेचं नाशिककरांनी देखील शहराप्रती आत्मियता दाखवावी. महापालिका स्तरावर स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या जातीलचं. शहर स्वच्छ असल्याचा महापालिकेचा देखील दावा राहील. परंतू जनसहभागासाठी भ्रमणध्वनीवरून माहिती विचारली जाईल त्यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत योग्य तो फिडबॅक देण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले. 


ऑगष्ट, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोंबर मध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येताना दिसतं आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नाशिककरांची साथ मिळाल्यानेच शक्य झाले आहे. स्वच्छ भारत अभियाना मध्ये देखील नाशिककरांनी साथ द्यावी.- कैलास जाधव, आयुक्त, महानगरपालिका. 
 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com