कांद्याचे लिलाव सुरू न झाल्यास जिल्हाभरात रास्ता रोको; राज्य कांदा उत्पादक संघटनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

ऐन सणासुदीच्या काळात व रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याचे काम वेगात सुरू असताना कांदा उत्पादकांना आर्थिक तरतुदीची गरज असताना साठवलेला कांदा बाजार समित्यांमध्ये विक्री करणे गरजेचे असून लासलगावसह सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे

नाशिक : केंद्र सरकारने होलसेल कांदा खरेदीची साठा मर्यादा 25 टनांची केल्याने त्याला विरोध म्हणून जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये कांदा व्यापारी सहभाग घेत नाही. असे कारण सांगून गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू न झाल्यास जिल्हाभरात रस्ता रोको करणार असा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

कांद्याचे लिलाव सुरू न झाल्यास जिल्हाभरात रस्ता रोको
ऐन सणासुदीच्या काळात व रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याचे काम वेगात सुरू असताना कांदा उत्पादकांना आर्थिक तरतुदीची गरज असताना साठवलेला कांदा बाजार समित्यांमध्ये विक्री करणे गरजेचे असून लासलगावसह सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

उलट दर घसरण्याचा धोका
याबाबत नाशिक जिल्ह्याचे उपनिबंधक सतीश खरे यांना राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने काल सोमवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव तात्काळ आजपासूनच सुरू करावे अशी या आशयाचे पत्र दिले आहे.
तरीही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झालेले नाहीत
बाजार समित्यांचे कामकाज बेमुदत बंद राहून पुढे बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतर अचानक कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन उलट दर घसरण्याचा धोका आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation due to onion auction nashik marathi news